अमेरिकेने काढला हात, पण भारताला मिळाले नवे साथीदार!

या देशांमध्ये वाढली भारतीय दागिने आणि वस्त्रोद्योगाची मागणी

    दिनांक :02-Nov-2025
Total Views |
नवी दिल्ली,  
demand-for-indian-jewelry-and-textiles जेव्हा अमेरिकेने भारतीय वस्तूंवरील कर वाढवले, तेव्हा अनेकांना वाटले होते की भारतीय निर्यातीला मोठा धक्का बसेल. विशेषतः वस्त्रोद्योग, रत्न-आभूषण आणि सागरी उत्पादन क्षेत्रावर. पण प्रत्यक्षात घडले त्याचे उलट! अमेरिकेपासून थोडे अंतर निर्माण होताच भारतासाठी नवे बाजार खुले झाले आणि अनेक देशांनी भारतीय उत्पादनांना उत्साहाने स्वीकारले.
 
demand-for-indian-jewelry-and-textiles
 
वाणिज्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, भारताच्या वस्त्रोद्योग, रत्न-आभूषण आणि सागरी उत्पादनांच्या निर्यातीमध्ये एशिया, युरोप आणि पश्चिम आशियातील देशांमध्ये प्रचंड वाढ नोंदवली गेली आहे. demand-for-indian-jewelry-and-textiles म्हणजेच भारत आता केवळ अमेरिकेवर अवलंबून राहिलेला नाही, तर त्याने आपले व्यापारिक संबंध विविध देशांपर्यंत विस्तारले आहेत. जानेवारी ते सप्टेंबर २०२५ दरम्यान भारताच्या सागरी उत्पादनांच्या निर्यातीमध्ये तब्बल १५.६ टक्क्यांची वाढ झाली असून ती ४.८३ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. अमेरिकेचा १.४४ अब्ज डॉलर्सचा वाटा अजूनही सर्वात मोठा असला तरी व्हिएतनामकडे निर्यात दुप्पट वाढली आहे. बेल्जियममध्ये ७३ टक्के, तर थायलंडमध्ये ५४ टक्क्यांची वाढ झाली आहे. चीन, जपान आणि मलेशिया या देशांतही भारतीय सागरी उत्पादनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. भारतीय वस्त्रोद्योगानेही अमेरिकेबाहेरील बाजारपेठांमध्ये आपले पाय मजबूत केले आहेत. यूएई, पेरू, नायजेरिया, इजिप्त आणि पोलंडसारख्या देशांमध्ये भारतीय कपड्यांना चांगली मागणी मिळत आहे. जानेवारी ते सप्टेंबर २०२५ दरम्यान वस्त्र निर्यात १.२३ टक्क्यांनी वाढून २८ अब्ज डॉलर्सच्या पुढे गेली आहे. यूएईमध्ये निर्यातीमध्ये ८.६%, नेदरलँडमध्ये ११.८%, पोलंडमध्ये २४% आणि इजिप्तमध्ये २४.५% वाढ झाली आहे.
रत्न आणि दागिन्यांच्या निर्यातीमध्येही भारताने आपली मजबूत पकड कायम ठेवली आहे. demand-for-indian-jewelry-and-textiles यंदाच्या पहिल्या सहामाहीत रत्न-आभूषण निर्यात १.२४ टक्क्यांनी वाढून २२.७३ अब्ज डॉलर्सवर पोहोचली. यूएईमध्ये ३७.७%, दक्षिण कोरियामध्ये १३४%, सौदी अरेबियामध्ये ६८% आणि कॅनडामध्ये ४१% अशी जबरदस्त वाढ नोंदवली गेली आहे.