14 ट्रॅक्टर माती पासून साकारला दुर्गराज किल्ले राजगड
- किल्लेदार प्रतिष्ठानची 16 वर्षांची परंपरा
दिनांक :02-Nov-2025
Total Views |
नागपूर,
durgraj-fort-rajgad छत्रपती शिवाजी महाराज आणि गडकिल्ले हे महाराष्ट्राचे निर्विवाद शक्तीपीठच. आजही हेच गडकिल्ले आपल्या जाज्वल्य इतिहासाच्या स्मृती कवटाळून तमाम भारतीयांना प्रेरणा देत आहे. याच किल्ल्यांचा मेरूमणी असलेल्या किल्ले राजगडाची तब्बल 14 ट्रॅक्टर माती वापरून प्रतिकृती किल्लेदार प्रतिष्ठानने सक्करदरा लेक गार्डन परिसरात साकारली आहे.
दिवाळीत गडकिल्यांची प्रतिकृती साकारण्याची फार माेठी परंपरा महाराष्ट्रात आहे. या किल्ल्यांवर घडलेला राेमहर्षक इतिहास येणाऱ्या पिढीला कळवा या उद्देशाने किल्लेदर प्रतिष्ठान नागपुरात 16 वर्षापासून ही परंपरा जपत आले आहे. durgraj-fort-rajgad यंदा देखील शहरातील सक्करदार लेक गार्डन परिसरात तब्बल 14 ट्रॅक्टर मातीपासून भव्य अशा दुर्गराज राजगड किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे. याविषयी किल्लेदार प्रतिष्ठानचे विशाल देवकर सांगतात, स्वराज्याची पहिली राजधानी असलेला हा किल्ला शिवकालीन इतिहासात आपले वेगळे महत्व ठेवताे. त्यामुळे या किल्ल्याविषयी लाेकांना अधिकाधिक माहिती व्हावी यासाठी सदर प्रतिकृती साकारली आहे. किल्ला साकारताना इकाे्रडली साहित्याचा वापर करण्यात आला आहे. या किल्याला माेठ्या संख्येने नागपूरकर भेट देत यावर घडलेला राेमहर्षक इतिहास जाणून घेत असल्याचेही त्यांनी सांगितले. शुभम तारेकर यांचाही किल्ले निर्माणात सहभाग हाेता.