जेरुसलेम,
israel-threatened-lebanon गाझामधील युद्धविरामानंतरही इस्रायलने अनेक वेळा हमासच्या ठिकाणांवर हल्ले केले आहेत. मात्र आता इस्रायलची नजर लेबनानवर आहे. हिजबुल्लाहमुळे लेबनान आणि इस्रायल यांच्यात आधीपासूनच तणाव निर्माण झाला आहे. इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी इशारा दिला आहे की, जर हिजबुल्लाहने शस्त्रे खाली ठेवली नाहीत, तर दक्षिण लेबनानमध्ये तीव्र हल्ले केले जातील. यापूर्वी लेबनानच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले होते की, इस्रायली हवाई हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे.

इस्रायलने चेतावणी दिली आहे की हिजबुल्लाह आगीत खेळत आहे आणि लेबनानचे राष्ट्रपती मागे हटण्याचा प्रयत्न करत आहेत. कोणत्याही परिस्थितीत लेबनानला हिजबुल्लाहकडून शस्त्रं खाली ठेवण्यास भाग पाडले जाईल, अन्यथा उत्तरी इस्रायलच्या सुरक्षेसाठी भीषण हल्ले केले जातील. शनिवारी रात्री इस्रायलने हवाई हल्ला केला होता, ज्यात दोहा-कफर रूमाने मार्गावर एक चारचाकी वाहनावर क्षेपणास्त्राने निशाणा साधण्यात आला. israel-threatened-lebanon एनएनएच्या माहितीनुसार, घटनास्थळी रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या. सुरक्षा सूत्रांच्या म्हणण्यानुसार, या हल्ल्यात मृत झालेल्या चारही व्यक्ती हिजबुल्लाहचे सदस्य होते, मात्र अधिक तपशील देण्यात आलेला नाही.
२७ नोव्हेंबर २०२४ पासून अमेरिका आणि फ्रान्सच्या मध्यस्थीने हिजबुल्लाह आणि इस्रायल यांच्यात युद्धविराम करार लागू करण्यात आला होता. त्यामुळे गाझामधील युद्धानंतर महिन्यांपासून सुरू असलेल्या सीमेवरील चकमकी थांबल्या होत्या. मात्र, या करारानंतरही इस्रायल अधूनमधून लेबनानवर हल्ले करत आहे. israel-threatened-lebanon इस्रायलचे म्हणणे आहे की ते हिजबुल्लाहच्या धोक्यांना लक्ष्य करत आहेत आणि लेबनान सीमेजवळ पाच प्रमुख ठिकाणी सैन्य तैनात केले आहे. ज्याप्रमाणे इस्रायलने युद्धविरामानंतरही लेबनानवर हल्ले सुरू ठेवले आहेत, त्याच पद्धतीचा अवलंब तो गाझामध्येही करत आहे. गाझामध्येही युद्धविरामानंतर झालेल्या इस्रायली हल्ल्यांमध्ये तब्बल पाच डझनहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.