हिंगणघाट,
Hinganghat, कार्यसम्राट आमदार समीर कुणावार यांच्या संकल्पनेतून हिंगणघाट मतदार संघातील विकासाचा आलेख दररोज उंचावत आहे. आपला मतदार संघ कोणत्याच बाबतीत मागे राहू नये असा संकल्प घेतल्यागत ते झपाटल्यागत कामं करीत आहेत. येथे उद्या सोमवार ३ सांस्कृतिक भवन आणि हिंगणघाट बसस्थानकाच्या पुर्न:बांधणी भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
 
 हिंगणघाट शहराच्या इतिहासात  नप क्षेत्रात कला आणि सांस्कृतिक वारसा जपण्याकरिता शहरात सुसज्ज असे नाट्यगृह असावे यासाठी आ. समीर कुणावार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री द्वय एकनाथ शिंदे व  अजित पवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. शासनाच्या विशेष निधी अंतर्गत १७ कोटी रुपयांतून  सांस्कृतिक सभागृह (नाट्यगृह)चे बांधकाम करण्यात येणार आहे. या नाट्यगृहाचे भूमिपूजन सकाळी १० वाजता उप जिल्हा रुग्णालयामागील शासकीय जागा संत तुकडोजी वार्ड येेथे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, माजी सांस्कृतिक मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार, माजी खासदार रामदास तडस आणि आ. समीर कुणावार यांच्या हस्ते होणार आहे. तसेच दुपारी १ वाजता हिंगणघाट बसस्थानकाच्या ५ कोटी रुपये निधीतून पुर्न:बांधणीचेही भूमिपूजन बस स्थानक परिसरात होणार आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.