अधिकार्‍यांना हाताशी धरून महेंद्र राऊतने शेतजमीन हडपली : राहूल तारे

    दिनांक :02-Nov-2025
Total Views |
बुलढाणा,
Raut tare डोंगरखंडाळा येथील गट नंबर १७५ मधील ११.३१ आर ही शेत जमिन सगंनमताने महेंद्र नारायण राऊत यांनी खरेदी केल्याचा तसेच मुंबई मंत्रालय ओएसडी सिद्धार्थ वसंत भंडारे यांच्या संगनमताने हा प्रकार घडत असल्याचा आरोप राहुल मिनानाथ तारे यांनी केला. या संदर्भात सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना गर्दे वाचनालयात झालेल्या कार्यक्रमात रितसर निवेदन देण्यात आले आहे.
 

Raut tare 
बुलढाणा Raut tare  येथील पत्रकार भवन येथे दि. २ नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषदेत त्यांनी यासंदर्भात केलेल्या तक्रारी व सातबारा नोंद हक्काची प्रत पत्रकारांना दिली आहे. याप्रसंगी भाग्यश्री मिनानाथ तारे, मेघना पेठे उपस्थित होत्या. डोंगरखंडाळा येथील २३ लोकांच्या नावावर असलेली २८ एकर जमिनीपैकी १४ एकर जमिन यामध्ये न्यायालयीन प्रकरण प्रलंबीत असतांना महेंद्र नारायण राऊत यांनी खरेदी केल्याचा आरोप राहूल तारे यांनी केला आहे. त्यांनी सांगितले की, मुंबई मंत्रालयातील ओएसडी सिद्धार्थ वसंता भंडारे अधिकारी याप्रकरणात सामिल असल्याचा आरोप त्यांनी पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत केल्याचे सांगितले. त्यांनी दुय्यमनिबंधक बुलढाणा व मंडळ अधिकारी यांना हाताशी धरून संगनमताने अधिकार्‍याचे मावस भाऊ महेंद्र नारायण राऊत यांनी हा प्रकार घडून आणल्याचा त्यांनी सांगितले. संबंधीतांची चौकशी कारावाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात महेंद्र नारायण राऊत यांनी या आरोपाचे खंडन करतांना पत्रकार परिषद घेऊन डोंगरखंडाळा गट क्रमांक १७५ मधील शेतजमीन खरेदी केल्याची माहिती देऊन फेरफार पत्रक तसेच न्यायालयाच्या आदेशाची प्रत पत्रकारांना दिली आहे.