‘मुस्लिमांचे पूर्वज होते हिंदू’, मुस्लिम युवकाच्या वक्तव्याने खळबळ; VIDEO व्हायरल

    दिनांक :02-Nov-2025
Total Views |
नवी दिल्ली,  
muslim-youths-video-viral भारतामध्ये हिंदू-मुस्लिम विषय नवीन नाही. काळानुरूप धर्म, ओळख आणि इतिहास यांवरून चर्चा वादळे उठतच राहिली आहेत. कधी एखाद्या वक्तव्यामुळे, तर कधी एखाद्या घटनेमुळे या विषयावर पुन्हा चर्चा रंगते. अलीकडेच सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल झाला आहे, ज्यात झाहक तनवीर नावाच्या एका मुस्लिम युवकाने दिलेल्या वक्तव्याने खळबळ माजवली आहे. या व्हिडिओमध्ये तनवीर यानी मुसलमानांच्या पूर्वजांविषयी मोठे आणि वादग्रस्त विधान केले आहे. त्यांचे म्हणने आहे की मुसलमानांचे पूर्वज हिंदूच होते आणि ही गोष्ट मान्य करण्यात कोणालाही लाज किंवा संकोच वाटू नये. हा व्हिडिओ त्यानी स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाउंट @zahacktanvir वर शेअर केला असून, आपल्या बायोमध्ये त्यांनी स्वतःला “Indian Writer” म्हटले आहे.
 
 
muslim-youths-video-viral
 
व्हिडिओमध्ये तनवीर शांत आवाजात म्हणताना दिसतो, “हिंदुस्तानातील मुसलमानांना नेहमी विचारले जाते की तुमचे पूर्वज हिंदू होते का? आणि आपण या गोष्टीला नाकारतो, पण हीच खरी वस्तुस्थिती आहे.” पुढे त्यांनी सांगितले की इतिहासात जे लोक इस्लाम धर्मात आले, ते आधी हिंदूच होते. इतकेच नव्हे तर त्यांनी हजरत अली यांचा उल्लेख करत सांगितले की, “हजरत अली जेव्हा सहा वर्षांचे होते, तेव्हा त्यांनी इस्लाम स्वीकारला, म्हणजे तेही जन्मतः मुसलमान नव्हते.” त्यांनी पुढे सांगितले की, यात कोणालाही भीती किंवा लाज वाटण्याचे काहीच कारण नाही, उलट ही ऐतिहासिक सत्यता म्हणून स्वीकारायला हवी. muslim-youths-video-viral तनवीरने आपल्या विधानात मलेशिया, इंडोनेशिया आणि फिलिपिन्ससारख्या देशांचे उदाहरण देत सांगितले की, त्या देशांतील मुसलमानही मान्य करतात की त्यांचे पूर्वज हिंदू होते. त्याने असही म्हटले  की, “आपण औरंगजेबाचे कौतुक करतो की त्याने हिंदूंना मंदिरे दिली, पण आज जर एखाद्या मुस्लिम देशात मंदिर बांधले जात असेल, तर त्याच लोकांचा विरोध सुरू होतो.” तनवीरच्या मते, इतिहासाचे सत्य मान्य करणे गरजेचे आहे, कारण त्यामुळे समाजात सौहार्द, समज आणि एकोपा वाढतो. धर्मापेक्षा माणुसकी आणि स्वीकाराची भावना महत्त्वाची आहे, असही त्यानी स्पष्ट केले.
 
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली. muslim-youths-video-viral आतापर्यंत दहा लाखांहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे. एका युजरने प्रतिक्रिया दिली, “पहिल्यांदाच कोणीतरी इतके प्रामाणिक सत्य बोलले.” दुसऱ्याने लिहिले, “धर्म-जात यापेक्षा देशाच्या विकासावर बोलायला हवे.” काहींनी तनवीरला “खरा माणूस” म्हटले, तर काहींनी त्याच्यावर “धर्मविरोधी” असल्याचा आरोप केला. एका युजरने लिहिले, “हा सगळा हिंदू-मुसलमानांत फूट पाडण्याचा प्रयत्न आहे.” या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा धर्म आणि ओळख यावर मोठी चर्चा पेटली आहे.