padmagandha-writer-natya-mahotsav माेठी पण अवास्तव स्वप्न, त्यासाठी कमी वेळात भरपूर पैसा कमविण्यासाठी विदेशात जाण्याचे घेतले जाणारे निर्णय, पण ते घेताना कुटुंबाला गृहित धरणे, आणि विदेशात गेल्यावर तिथले जीवघेणे वास्तव अन यातून हाेरपळून निघणारे पती-पत्नी असे सध्याच्या धावत्या जगाचे विदारक सत्य मांडणारे शिकार हे नाटक प्रेक्षकांनाही अरब देशातील सत्यस्थिती दिखवितानाच नात्याचे तुटत चाललेले बंध अन् ठासळत चाललेली कुटुंबव्यवस्था अधाेरेखित करून गेले.
पद्मगंधा साहित्य प्रतिष्ठानद्वारे आयाेजित लेखिका नाट्य महाेत्सव 2025 अंतर्गत शनिवारी उर्मिला देशपांडे लिखित आणि प्रभा देऊस्कर दिग्दर्शित शिकार या नाटकाचा प्रयाेग सादर झाला. आभा व आलाेक हे तरूण जाेडपे घरच्यांचा विराेध पत्कारून चार वर्षाचा वर्कव्हिसा मिळवूून साैदी अरेबियातील रियाधला जातात. padmagandha-writer-natya-mahotsav अन् तिथले वास्तव समजायच्या आतच संकटात सापडतात. यानंतर काय स्थित्यंतरे घडतात याचा अंगावर शहरे आणणारा पट या नाटकात दाखविण्यात आला आहे. नाटकात शेखर मंगळमूर्ती, मयुरी टाेंगळे, वेदांत व्यास, प्रभा देऊस्कर, वर्षा देशपांडे, मेघा औरंगाबादकर सार्थक पांडे व्यंकटेश आयचित यांच्या भूमिका हाेत्या. नाटकाचे सुरेख नेपथ्य विजय देऊस्कर यांचे हाेते. रंगमंचव्यवस्था सतीश काळबांडे, प्रकाशव्यवस्था शिवशंकर माळाेदे तर संगीत अनिल इंदाने यांचे हाेते.