नाट्यकलेत सर्व कलांचा संगम

भास्कर पाटील यांचे प्रतिपादन ;पद्मगंधा लेखिका नाट्य महाेत्सवाला सुरुवात

    दिनांक :02-Nov-2025
Total Views |
नागपूर, 
padmagandha-writers-theatre-festival संगीत, नाट्य व साहित्यातून आपली संस्कृती प्रवासही हाेत असते. नाट्यकला हा सर्व कलांचा संगम असताे. त्यामुळे संस्कृती टिकविण्यासाठी नाट्यकला अधिकाधिक बहरणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राष्ट्रभाषा प्रचार समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. भास्कर पाटील यांनी काढले. राष्ट्रीय चरित्रकार शुभांगी भडभडे यांनी लिखाणासाठी आपले आयुष्य पणाला लावले. त्यासाठी आज त्यांचे स्मरण अत्यावश्यक असल्याचेही ते म्हणाले.
 
 
padmagandha-writers-theatre-festival
 
पद्मगंधा साहित्य प्रतिष्ठानर्ते आयाेजित 27 व्या लेखिका नाट्य महाेत्सवाच्या उ‌द्घाटनप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बाेलत हाेते. याप्रसंगी व्यासपीठावर उ‌द्घाटक अधिकृत लेखापरीक्षक प्रवीण राजवैद्य, संस्थेच्या अध्यक्ष व नाट्यविभाग प्रमुख प्रभा देऊस्कर, उपाध्यक्ष शुभांगी गान, सत्कारमूर्ती व ज्येष्ठ रंगकर्मी शुभदा सावदेकर यांची उपस्थिती हाेती. याप्रसंगी संस्थेर्ते शुभदा सावदेकर यांचा सन्मानचिन्ह व शाल देऊन सत्कार करण्यात आला. padmagandha-writers-theatre-festival सत्काराला उत्तर देताना त्या म्हणाल्या, प्रेक्षक-कलावंत संबंध अनन्यसाधारण आहेत. कलाकृतीला मिळणारी उत्सुर्फत दाद हेच माेठे बक्षिस असते. नाटकाचे वेड व चेहऱ्याचा रंग हेच माझे जीवन असल्यामुळे मी अविरत रंगभूमीची सेवा व याेगाचा प्रचार करती असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या. प्रवीण राजवैद्य म्हणाले, नवसाहित्यिकांना लिहिते करीत त्यांनी माेट बांधण्याचे महत्वाचे कार्य शुभांगीताईनी केले. त्यांना शुभांगी धडपडे संबाेधणे सार्थ ठरेल, असेही ते यावेळी म्हणाले. प्रास्ताविक प्रभा देऊस्कर यांनी नाट्यमहाेत्सवासाठी सचिव संगीता वाईकर, वर्षा देशपांडे, शुभांगी गान परिश्रम घेत आहेत.
‘रत्नावली’नाटकाने महाेत्सवास प्रारंभ
कार्यक्रमाच्या द्वितीय सत्रात्त ऋतुजा मनाेहर लिखित व दिग्दर्शित ’रत्नावली’ या नाटकाचे दमदार सादरीकरण झाले. padmagandha-writers-theatre-festival अपर्णा पुणेकर, स्वाती देशपांडे, नीता शाे, निशीगंधा वाेकर, जाई पितळे, सुकृत जाेगळेकर, श्रुती पुणेकर, श्रेया पुणेकर आणि विनिता पैठणकर यांनी नाटकात भूमिका साकारल्या.