एजंटशिपमुळे भारतातील पेटंट प्रक्रिया प्रभावित

- डाॅ. राहुल पेठे यांनी उलगडला 33 पेटंटचा प्रवास

    दिनांक :02-Nov-2025
Total Views |
पराग मगर
नागपूर, 
patent-process-in-india एखादी नाविण्यपूर्ण कल्पना इतरांसाेबत मांडल्यानंतर दुसऱ्या व्यक्तिकडून तिचा व्यावसायिक हेतून उपयाेग केला जाऊ शकताे. त्यामुळे त्या कल्पनेचे पेटंट हाेणे अत्यावश्यक आहे. परंतु माहितीचा अभाव आणि एजंटशिप यामुळे फसवणूक आणि लुबाडणुकीचा धाेका असताे. हा प्रकार भारतात माेठ्या प्रमाणावर हाेत आल्याने पेटंट प्रक्रिया प्रभावित हाेत संख्येवरही त्याचा विपरित परिणाम हाेत आल्याचे वास्तव आजवर 33 पेटंट मिळविणारे डाॅ. राहुल पेठे यांनी मांडले.
 
 
patent-process-in-india
 
तंत्रज्ञानात नवनवीन कल्पनांना जन्म देणारे प्रसिद्ध संशाेधक डाॅ. राहुल पेठे यांनी 2016 पासून आजवर तब्बल 33 पेटंट मिळविले आहे. या उल्लेखनीय याेगदानासाठी त्यांना नुकताच केंद्र शासनाद्वारे इंडियन बुक ऑफ रेकाॅर्ड्स अचिव्हर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तरुण भारतने त्यांच्याशी खास संवाद साधला असता त्यांनी पेटंटची प्रक्रिया, आवश्यकता, यातील फसवेगिरी यासह इतरही बाबींचा उलगडा केला. ते म्हणाले, पेटंट ड्राफफ्टिंग करणे ही सर्वांत पहिली आणि महत्वाची पायरी असते. अनेक जण ते दुसरीकडून तयार करून घेतात. परंतु माझ्या प्रत्येक पेटंटचे ड्राफफ्टिंग मी स्वतः केले असून त्यात कुणीच अटर्नी नाही. हीच बाब पुरस्कारासाठी इंडियन बुक ऑफ रेकाॅर्ड्सने अधाेरेखित केल्याचे त्यांनी सांगितले. patent-process-in-india डाॅ. राहुल हे एस. बी. जैन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नाेलाॅजी मॅमेजमेंट अँड रिसर्च नागपूर येथे सहयाेगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. समाजाेपयाेगी संशाेधन करून त्यावर डाॅ. पेठे सातत्याने काम करीत असतात. इस्त्राेसह देशातील विविध संस्थांमध्ये त्यांनी तयार केलेल्या प्रारुपांच्या माध्यमावर काम सुरू आहे.
कशी असते पेटंट प्रक्रिया
कुठलाही व्यक्ती संकल्पना, प्रक्रिया आणि उत्पादनाचे पेटंट घेऊ शकताे. त्याचे आराखडा(डिझाईन) आणि उत्पादन(प्राेडक्स) असे दाेन भाग असतात. सर्वप्रथम पेटंट ड्राफफ्टिंग करून ते सादर करावे लागते. या सादरीकरणानंतर जागतिक स्तरावर त्याचे सर्वेक्षण हाेते. त्यानंतर ते प्रकाशित हाेत फर्स्ट एक्झामिनेशन रिपाेर्ट र्माफत त्याची परीक्षा घेतली जाते. patent-process-in-india यासाठी कंट्राेलर आणि एक्झामिनर नेमले जातात. भारतात मुंबई, दिल्ली, काेलकाता आणि चेन्नई या चार केंद्रांवर पेटंटचे सादर केले जातात. यानंतर अहवाल तयार हाेताे. यावर सादरकर्त्याने उत्तर दाखल केल्यानंतर त्याची सुनावणी हाेते. यातून परीक्षकांचे समाधान झाल्यावरच पेटंट प्राप्त हाेते.
फसवेगिरीच अनेक प्रकार
कुणी आपली संकल्पना चाेरू नये यासाठी पेटंट केले जाते. परंतु पेटंट तयार करण्यातही फसवेगिरीचे अनेक प्रकार घडतात. खास करून एजंट र्माफत त्याचे ड्राफफ्टिंग करताना आपली या संकल्पेनची पूर्ण माहिती एजंटकडे गेलेली असते. patent-process-in-india त्यामुळे परस्पर एंजटनेच स्वतःच्या नावावर पेटंट घेत ते विकल्याचे प्रकार घडत असल्याचे डाॅ. पेठे यावेळी म्हणाले.