रत्नीबाईचे विद्यार्थी पुन्हा शाळेच्या दारात

३५ वर्षांनंतर दहावीच्या विद्यार्थ्यांचा भावनिक मिलाप!

    दिनांक :02-Nov-2025
Total Views |
वर्धा,
Ratnibai School, alumni reunion : काळ कितीही पुढे गेला तरी शाळेच्या आठवणी कधीही मागे राहत नाहीत, याचा प्रत्यय आला तो स्थानिक रत्नीबाई विद्यालयात. २५ ऑटोबर रोजी सकाळी १९९० साली दहावी उत्तीर्ण झालेल्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचे ३५ वर्षांनंतरचे दिवाळी स्नेहमिलन आनंदात व भावनांच्या भरात पार पडले.३५ वर्षांनंतर आपल्या वर्गात, त्या जुन्या बाकावर बसताना विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले. त्या भिंती, ती वर्गखोली, आणि मैदान पाहून सर्वांना पुन्हा बालपणाचा आनंद अनुभवता आला.
 

Ratnibai School, alumni reunion, 
कार्यक्रमाला प्रमुख Ratnibai School, alumni reunion  पाहुणे म्हणून माजी शिक्षिका केदार, खर्चे आणि मुख्याध्यापक रेखा जुगनाके उपस्थित होत्या. स्वागत-सत्काराचा सुंदर सोहळा पार पडला. खर्चे यांचा सन्मान संध्या उराडे व अरुणा सुकळकर यांनी केला. शाळेतील सेवक उत्तम ठाकरे यांनाही विद्यार्थ्यांनी शाल-श्रीफळ देऊन सन्मानित केले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. माजी विद्यार्थिनी मनीषा शिंदे मेश्राम यांनी या स्नेहमिलनामुळे पुन्हा एकदा आपले बालपण जगल्यासारखे वाटले. त्या बाकांवर बसताना अनेक आठवणी डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या तर अभिजित भेंडे यांनी ३५ वर्षांनी पुन्हा एकदा तेच चेहरे तिच मैत्री आणि त्या जुन्या आठवणी पाहून मन भरून आलं. आपण अजूनही तेच खट्याळ, हसरे दहावीचे मित्र आहोत, असे ते म्हणाले.
 
 
माजी शिक्षिका केदार Ratnibai School, alumni reunion  यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. विद्यार्थी जेव्हा शिक्षकांची आठवण काढतात, तो क्षण सर्वात अमूल्य असतो, असे त्या म्हणाल्या. खर्चे यांनी विद्यार्थ्यांनी घेतलेली प्रगती पाहून आनंद व्यत केला आणि भविष्यात सद्विचारांनी मार्गक्रमण करण्याचा सल्ला दिला. मुख्याध्यापक रेखा जुगनाके यांनी विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या सन्मानाने भारावल्याचे सांगितले. संचालन पराग मिटकरी यांनी केले.
 
 
या स्नेहमिलनात नैना मेघे, विणा शेंडे, स्नेहल गिरडकर, ममता गुल्हाने, प्रवीण साठवणे, गिरीश चवडे, निलेश भोवरे, चेतन पडोळे, निलेश मेधे, प्रशांत सबाने, मंदार अभ्यंकर आदी मित्र उत्साहाने सहभागी झाले.