वडिलांच्या निधनाची बातमी ऐकताच मुलाचा मृत्यू; एकाच वेळी दोघांचा अंत्यसंस्कार

    दिनांक :02-Nov-2025
Total Views |
बुलंदशहर, 
bulandshahr-father-son-death बुलंदशहरमध्ये घडलेली एक हृदय पिळवटून टाकणारी घटना सर्वत्र दु:खाचा विषय ठरली आहे. आजारी वडिलांच्या निधनानंतर अवघ्या काही तासांत त्यांच्या मुलाचाही मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे. वडील आणि मुलाचा अंत्यसंस्कार गंगा घाटावर एकाच वेळी करण्यात आला.
 
bulandshahr-father-son-death
 
जहांगीराबाद नगरातील जटियान मोहल्ल्यातील ‘शिशु भारती स्कूल’ गल्लीतील रहिवासी राजेंद्र प्रजापती मजुरीचे काम करत होते. काही काळापासून ते गंभीर आजाराने त्रस्त होते. शनिवारी सायंकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूची बातमी मुलगा पंकज प्रजापती (वय २६) याला काही तास सांगितली गेली नाही. पंकज कार चालक म्हणून काम करत होता आणि त्याच्याही आरोग्याची स्थिती काही वर्षांपूर्वी झालेल्या अपघातानंतर बिघडलेली होती. वडिलांच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर काही तासांतच पंकजची प्रकृती अचानक खालावली. त्याला तात्काळ शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. काहीच तासांच्या अंतरात वडील आणि मुलगा दोघांचेही निधन झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. पंकज प्रजापती मागे दोन वर्षांचा मुलगा आणि गर्भवती पत्नी असा परिवार आहे. bulandshahr-father-son-death रविवारी सकाळी अत्यंत गमगीन वातावरणात गंगा घाटावर वडील-मुलाचा अंत्यसंस्कार करण्यात आला. हे दृश्य पाहून उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू दाटले. या घटनेने संपूर्ण गाव स्तब्ध झाले आहे.