सिंदीरेल्वे,
Soybean purchase कर्ज मुक्तीचे आंदोलन शमले आणि सरकारने नाफेड आणि विदर्भ मार्केटिंग फेडरेशनला कास्तकारांचे पिवळे सोने खरेदी प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले. शासनाने शेतकर्यांकडील सोयाबीन खरेदी करण्याची तयारी केली आहे.
सेलू तालुयातील शेतकर्यांनी सिंदी खरेदी-विक्री सह. संस्थेच्या सेलूच्या कार्यालयात नोंदणी करायची आहे. सिंदी तालुयातील शेतकर्यांनी यंदा केवळ कृ. उ. बाजार समितीच्या कार्यालयाकडे १५ डिसेंबरपर्यंत नावे नोंदवावीत. गतवर्षी या दोन्ही केंद्रांसोबतच झडशी येथील संकलन केंद्रावरुन ३६ हजार. किलो सोयाबीनची खरेदी झाली होती. यंदा, झडशीच्या केंद्राचा उल्लेख नाही. यावर्षी सोयाबीनची सरासरी उतारी दीड ते दोन क्विंटल एकरी आहे. त्यातही सोयाबीन पावसात सापडल्यामुळे बेरंगी दिसते. १ नोव्हेंबरपासून नोंदणीला सुरुवात झाली असली तरी खविस संस्थेकडे पहिल्याच दिवशी १४ शेतकर्यांनी संपर्क साधल्याचे सह व्यवस्थापक पवार यांनी सांगितले.