शिवनगर हनुमान मंदिरात कार्तिक एकादशी उत्सव साजरा

    दिनांक :02-Nov-2025
Total Views |
नागपूर,
The month of Kartik शिवनगर येथील हनुमान मंदिरात कार्तिक महिन्यात पारंपरिक पद्धतीने महिला मंडळ दररोज पहाटे काकड आरतीचे सादरीकरण करते. दिनांक २ नोव्हेंबरला कार्तिक एकादशी निमित्त मंदिर परिसराची स्वच्छता करून सडा-रांगोळ्यांनी सजावट करण्यात आली. विठ्ठल-रुखमाई व इतर मूर्तींची फुलांनी आकर्षक सजावट करून मंगलस्नान व पूजन चंद्रकांत आणि शशीकला चांदेकर दांपत्याच्या हस्ते पार पडले.


ooo 
 
या प्रसंगी मंजू गाताडे, सुरेश गायकवाड, अंजली गाताडे आदी उपस्थित होते. The month of Kartik  शिवनगर महिला मंडळ व हावरापेठ काकड आरती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अभंग, भजन सादरीकरण आणि प्रभातफेरी काढण्यात आली. त्यानंतर महाआरती, प्रसाद वितरण व राष्ट्रवंदनाने कार्यक्रमाचा समारोप झाला.कार्यक्रमाचे संचालन तुळशीराम गायकवाड यांनी केले तर आभार सुनिता गायकवाड यांनी मानले.
सौजन्य : रमेश मेहर,संपर्क मित्र