यवतमाळ
Tulsi Vivah हिंदू संस्कृतीचा महत्त्वाचा उत्सव म्हणजे कार्तिक एकादशी ते पौर्णिमेपर्यंत घरोघरी होणारा तुळशी विवाह आहे. यामागे भक्तीसोबत पर्यावरणाचा संदेश दिला जातो.
पण घरोघरी होणारा तुळशी श्रीकृष्णाचा विवाह सोहळा सामाजिक भान ठेवून सामूहिकरित्या साजरा होत आहे. येथील श्री बालाजी देवस्थान, वीर सावरकर नगर येथे 2 नोव्हेंबर रविवारी सकाळी 7 वाजता तसेच श्री गणपती मंदिर सहकार नगर, राणाप्रताप नगरजवळ मंगळवार, 4 नोव्हेंबर मंगळवारी 7 वाजता होत आहे. तरी सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन दोन्ही मंदिराच्या विश्वस्तांनी केले आहे.