मंदिर निर्माता म्हणाला; हा "दैवी प्रकोप" चेंगराचेंगरीसाठी कोणीही जबाबदार नाही

वेंकटेश्वर स्वामी मंदिर चेंगराचेंगरी प्रकरण

    दिनांक :02-Nov-2025
Total Views |
काशीबुग्गा,  
venkateswara-swamy-temple आंध्र प्रदेशातील काशीबुग्गा येथे वेंकटेश्वर स्वामी मंदिरात एकादशीच्या दिवशी भीषण दुर्घटना घडली. मोठ्या गर्दीमुळे निर्माण झालेल्या चेंगराचेंगरीत किमान दहा जणांचा मृत्यू झाला आहे. हे मंदिर अद्याप बांधकामाधीन अवस्थेत असून, तिरुपती मंदिराच्या धर्तीवर उभारण्यात आले आहे. हे मंदिर ओडिशातील ९४ वर्षीय हरी मुकुंद पांडाच्या प्रयत्नातून बांधले गेले असून, अवघ्या चार महिन्यांपूर्वीच भाविकांसाठी खुले करण्यात आले होते. हरी मुकुंद पांडा यांनी या दुर्घटनेला "दैवी प्रकोप" म्हणत कोणालाही जबाबदार धरता येत नाही, असे सांगितले.
 
venkateswara-swamy-temple
 
एकादशीच्या दिवशी मंदिर परिसरात सुमारे दहा हजार भाविक जमा झाले होते. सकाळी सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास प्रवेशद्वाराजवळील रेलिंग तुटल्याने लोक एकमेकांवर पडले आणि चेंगराचेंगरी झाली. या घटनेत अनेक जण जखमी झाले, तर दहा भाविकांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी सांगितले की, प्रशासनाला गर्दीबद्दल पूर्वसूचना देण्यात आली असती, तर पोलिसांनी योग्य ‘क्राउड मॅनेजमेंट’ची आखणी केली असती आणि ही दुर्घटना टळली असती. पोलिसांनी सांगितले की, मंदिराच्या आयोजकांनी स्थानिक प्रशासनाला या कार्यक्रमाबद्दल कोणतीही माहिती दिली नव्हती. venkateswara-swamy-temple त्यामुळे योग्य सुरक्षा व्यवस्था करता आली नाही. या घटनेनंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०० (सदोष हत्या) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. लक्षवेधी बाब म्हणजे हे मंदिर आंध्र प्रदेश सरकारच्या अधिकृत नोंदणीतदेखील समाविष्ट नव्हते.
एका भाविकाने सांगितले की, सकाळी नऊ वाजताच्या सुमारास गर्दी अचानक वाढली. venkateswara-swamy-temple मंदिरातील अरुंद जिने आणि प्रवेश-निर्गमाचे एकच दार असल्याने लोकांमध्ये गोंधळ माजला. रेलिंग तुटल्यावर अनेक जण खाली कोसळले आणि चेंगराचेंगरी झाली. श्री सत्य साई जिल्ह्यातील एका सभेत बोलताना मुख्यमंत्री नायडू यांनी आयोजकांनी पोलिसांना पूर्वकल्पना न दिल्याचा आरोप केला. श्रीकाकुलम जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक के. व्ही. महेश्वर रेड्डी यांनी सांगितले की, कोणत्याही धार्मिक कार्यक्रमासाठी आयोजकांनी पोलिसांची परवानगी घेणे अनिवार्य आहे, मग गर्दी कितीही असो.