लहान भावाचे अमानवी कृत्य; भावाचा खून, गर्भवती वहिनीवर बलात्कार आणि...

    दिनांक :02-Nov-2025
Total Views |
जुनागड,  
gujarat-crime गुजरातमध्ये एक हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. पोलिस चौकशीत एका १५ वर्षाच्या मुलाने जे कबूल केले ते ऐकून सर्वच स्तब्ध झाले. या आरोपीने आधी आपल्या मोठ्या भावाची निर्दयपणे हत्या केली आणि नंतर भीतीने थरथरणाऱ्या गर्भवती वहिनीवर बलात्कार करून तिलाही अमानुषपणे ठार मारले. ही घटना जुनागढपासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गावात घडली असून हे कुटुंब मूळचे बिहारचे असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
 
gujarat-crime
 
१६ ऑक्टोबर रोजी घडलेल्या या दुर्दैवी घटनेचा भेद शुक्रवारी उघड झाला, जेव्हा पोलिसांना दोघांचे मृतदेह सापडले. बिहारमध्ये राहणाऱ्या मृत महिलेच्या माहेर कडून संपर्क आल्यावर पोलिसांनी तपास सुरू केला. प्राथमिक चौकशीत समोर आले की आरोपी मुलगा एका डेअरीमध्ये काम करत होता आणि त्याचा मोठा भाऊ त्याला वारंवार मारहाण करून त्याचे पैसे काढून घेत असे. या सततच्या अपमानामुळे चिडलेल्या आरोपीने लोखंडी रॉडने भावाच्या डोक्यावर सतत प्रहार करून त्याला ठार केले. या घटनेनंतर वहिनीने हा भीषण प्रकार पाहताच ती घाबरली आणि आपल्या जीवाची भीक मागू लागली. मात्र आरोपीने तिची विनंती मान्य केली नाही आणि सांगितले की, जर ती त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवेल तरच तो तिला वाचवेल. gujarat-crime त्यानंतर सहा महिन्यांची गर्भवती असलेल्या वहिनीवर त्याने अत्याचार केला. परंतु त्याला भीती वाटली की ती पोलिसांना सर्व सांगेल, त्यामुळे त्याने तिचा गळा आवळून आणि पोटावर जबरदस्त प्रहार करून तिचा जीव घेतला. या निर्दयी हल्ल्यामुळे गर्भातील भ्रूण बाहेर पडला. या संपूर्ण गुन्ह्यानंतर आरोपीने आपल्या आईच्या मदतीने दोन्ही मृतदेह पाच फूट खोल खड्ड्यात पुरले आणि पुरावे नष्ट करण्यासाठी कपडे जाळले. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढले असता ते नग्न अवस्थेत सापडले. पुरुषाचा डोके पूर्णपणे चिरडलेले होते, तर महिलेच्या शरीरावर गंभीर जखमा होत्या आणि भ्रूण गर्भाशयाबाहेर पडलेला होता. पोलिसांनी आरोपीची आईलाही अटक केली असून तिने मुलाला शव पुरण्यात मदत केल्याचे उघड झाले आहे.
पोलिसांच्या मते, गुन्हा घडत असताना आरोपीची आईही घटनास्थळी उपस्थित होती. gujarat-crime आरोपीने पोलिसांसमोर वहिनीवर अत्याचार केल्याची कबुली दिली असून वैद्यकीय अहवाल आल्यानंतर या गोष्टीची अधिकृत पुष्टी होईल. मृत महिलेच्या नातेवाईकांनी तिच्या सासूशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तिने खोटे सांगितले की दोघांचा अपघातात मृत्यू झाला आहे. पण जेव्हा त्यांनी अपघाताचे फोटो मागितले तेव्हा ती टाळाटाळ करू लागली. संशय वाढल्यानंतर मृत महिलेचे नातेवाईक बिहारहून विसावदर येथे आले आणि पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिस तपासात उघड झाले की हिम्मतनगर परिसरात कोणताही अपघात झाला नव्हता. अखेरीस पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या आईची चौकशी केली असता संपूर्ण सत्य समोर आले.