कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन

केंद्रीय कृषि मंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती

    दिनांक :20-Nov-2025
Total Views |
नागपूर,
Agrovision Nagpur मध्य भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन ‘अ‍ॅग्रोव्हिजन चे उद्घाटन शुक्रवार, २१ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह यांच्या हस्ते राष्ट्रसंत महाराज नागपूर विद्यापीठाच्या अमरावती रोडवरील मैदानावर होणार आहे.
 

io
 
अ‍ॅग्रोव्हिजनचे मुख्य प्रवर्तक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल, सहकारिता राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, एनडीडीबीचे व व्यवस्थापकीय संचालक डॉ. मिनेश शाह, युपीएलचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी आणि विक्रम श्रॉफ, महिंद्राचे अध्यक्ष विजय राम नाकरा, समर्थचे मिशन डायरेक्टर (एनटीपीसी) अनिल बावेजा यांची विशेष उपस्थिती राहील. उद्घाटन सत्रानंतर दुपारी १ वाजता लगेच ’डेअरी-चारा व्यवस्थापन, नवीन तंत्रज्ञान आणि प्रक्रिया’ याविषयीच्या विशेष कार्यशाळा, एमएसएमई इन्स्टीटयूटच्या सहकार्याने ’तेलबिया अभियानाशी संबंधित मधमाशी पालना’वरील राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे.
 
 
राष्ट्रीय कृषी प्रदर्शन, कार्यशाळा, एकदिवसीय परिषदा असे स्वरूप असलेल्या अ‍ॅग्रोव्हिजनचा शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रवी बोरटकर, रमेश मानकर व इतर पदाधिका-यांनी केले आहे.