धक्कादायक! युवतीचा जळालेला मृतदेह आढळला

    दिनांक :20-Nov-2025
Total Views |
अकोला,
Akola burning body अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील धनेगाव शेतशिवारात आज संध्याकाळी धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पोलीस पाटील प्रमोद लांडे यांच्या शेताजवळ सुमारे 30 ते 32 वयोगटातील अज्ञात युवतीचा जळालेला मृतदेह आढळला. युवतीच्या अंगावर एकही कपडा नसल्यामुळे आणि परिसर निर्जन असल्यामुळे प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे की, ही युवती इतरत्र ठार करून येथे आणण्यात आली असावी. घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून, युवतीची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. धनेगाव शेतशिवारात तरुणीचा जळालेला मृतदेह आढळल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे आणि नेमकी हत्या आहे की अन्य काही प्रकार, हे तपासाद्वारे उघड होणार आहे.
 

Akola burning body 
तलवारीने हल्ला
याच दिवशी जालना Akola burning body  शहरातही धक्कादायक घटना घडली. शहरातील नूतन वसाहत भागात भाजीपाला घेत असताना 45 वर्षीय बाबासाहेब सोमधाने यांच्यावर तलवारीने हल्ला केला गेला, ज्यात त्यांचा मृत्यू झाला. चारचाकी वाहनातून आलेल्या तीन जणांकडून हा भर बाजारात केलेला हल्ला झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि लगेच तपास सुरु केला. पोलीसांनी या प्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेतले असून, प्राथमिक तपासात हा हल्ला जुना वाद आणि जमिनीच्या व्यवहारातून झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या हल्ल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.दोन्ही प्रकरणांमध्ये पोलीस सध्या तपास करत असून मृतदेहांच्या ओळखीचा आणि हत्येच्या कारणांचा शोध घेत आहेत.