नवी दिल्ली,
al-falah-university-president दिल्ली बॉम्बस्फोटात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या अल-फलाह विद्यापीठाचे अध्यक्ष मोहम्मद जवाद अहमद सिद्दीकीचे मध्य प्रदेशातील इंदूर येथील महू येथील वडिलोपार्जित घर बेकायदेशीर असल्याचे आढळून आले आहे. बुधवारी महू येथील मुकेरी मोहल्ला येथील घर क्रमांक १३७१ वर अनधिकृत बांधकामासाठी नोटीस लावण्यात आली. हे घर जवाद अहमद सिद्दीकीचे वडील हम्मद सिद्दीकीच्या मालकीचे असल्याचे वृत्त आहे.

जवाद अहमद सिद्दीकीने शहराच्या मध्यभागी असलेल्या मुकेरी मोहल्ला येथे एक आलिशान पाच मजली घर बांधले. ८६० चौरस फूट जागेच्या या घरात तळघरासह चार मजले आहेत. त्यात तीन गॅलरी आणि समोर १२ खिडक्या आहेत. काही काळापासून घराभोवती पाळत ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. al-falah-university-president मिळालेल्या माहितीनुसार, जवादचे वडील हम्मद यानी जवळजवळ २० वर्षे महू शहर काझी म्हणून काम केले. हे घर त्याच्या मृत्यूच्या एक वर्ष आधी १९९४-९५ मध्ये बांधण्यात आले होते. जर तीन दिवसांत अनधिकृत बांधकाम पाडले नाही तर कॅन्टोन्मेंट बोर्ड ते पाडण्याची कारवाई करेल. महू येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ विकास कुमार यांनी सांगितले की, अनधिकृत बांधकाम हटवण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून तीन नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. २९ वर्षांपूर्वी २३ डिसेंबर १९९६ रोजी कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आली होती. त्यानंतर २ नोव्हेंबर १९९६ रोजी कॅन्टोन्मेंट कायदा, १९२४ च्या कलम १८५ अंतर्गत अनधिकृत बांधकाम पाडण्याची नोटिस देण्यात आली होती. शेवटची तिसरी नोटिस २७ मार्च १९९७ रोजी कॅन्टोन्मेंट कायदा, १९२४ च्या कलम २५६ अंतर्गत बजावण्यात आली होती. त्यानंतरही जवादच्या कुटुंबाने बांधकाम हटवण्यास नकार दिला. कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अभियंता एच.एस. कलोया यांनी सांगितले की, जर तीन दिवसांत बांधकाम हटवले नाही तर कॅन्टोन्मेंट बोर्ड घर पाडेल.