राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्राची चमक

    दिनांक :20-Nov-2025
Total Views |
नागपूर,
Aside Football Association भोपाळ येथील एलएनसीटी कॉलेजमध्ये १४ ते १६ नोव्हेंबर दरम्यान झालेल्या राष्ट्रीय ७-अ‍ॅसाइड फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्राने प्रभावी कामगिरी करत दोन पदकं पटकावली. १९ वर्षांखालील संघाने सुवर्णपदक जिंकले, तर १७ वर्षांखालील संघाने कांस्यपदक मिळवून राज्याचा मान वाढवला.

lalsing 
 
ही कामगिरी महाराष्ट्र ७-अ‍ॅसाइड फुटबॉल असोसिएशनचे सचिव व मुख्य प्रशिक्षक लालसिंग यादव यांच्या मार्गदर्शनाखाली साध्य झाली. प्रशिक्षक विष्णू वाघे आणि अनुराग सोलंकी यांनी दोन्ही संघांना उत्कृष्ट तयारी करून दिली.Aside Football Association अध्यक्ष कुमार मसराम यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांच्या मेहनतीचे कौतुक केले.दोन्ही गटांतील खेळाडूंनी दमदार प्रदर्शन करून महाराष्ट्राचे वर्चस्व राष्ट्रीय पातळीवर अधोरेखित केले.
सौजन्य:लालसिंग यादव ,संपर्क मित्र