आष्टी (श.),
bjp-marches-on-against-water-supply एक दिवसाआड पाणी पुरवठा व कचरा संकलन बंदच्या विरोधात शहर भाजपाच्या वतीने शहरवासीयांना घेऊन आष्टी नगरपंचायतीवर आज गुरुवार २० रोजी मोर्चा काढण्यात आला.
शहरात मागील तीन आठवड्यापासून कचरा संकलन बंद असून पाणी पुरवठाही एक दिवसाआड केल्या जात आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. या विरोधात नागरिकांसह आष्टी शहर भाजपाने मोर्चा काढला. या मोर्चात शहरातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते. bjp-marches-on-against-water-supply आष्टी नगरपंचायतचा सत्ताधारी पक्ष नागरिकांच्या मुलभूत सुविधा पुरवण्यात असमर्थ ठरल्याने भाजपा नेत्यांनी नगरपंचायत बरखास्त करण्याची मागणी केली. तसेच पाणी पुरवठा एक दिवसाआड होत असल्याने पाणी पट्टी कर ५० टक्के कमी करण्यात यावा, अशी मागणीही केली.
येत्या काही दिवसात या समस्येवर तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन करून उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या मोर्चात भाजपा कार्यकर्त्यांसह असंख्य नागरिक सहभागी झाले होते. bjp-marches-on-against-water-supply बाजार पेठेतून निघालेला मोर्चा मुख्य मार्गाने नगरपंचात कार्यालयासमोर गेल्यानंतर भाजपा गटनेते व नगरसेवक अॅड. मनीष ठोंबरे, भाजपा नेते अशोक विजयकर यांनी मोर्चाला संबोधित केले. गटनेते मनीष ठोंबरे यांनी सत्ताधार्यांच्या भोंगळ कारभाराचे वाभाडे काढत शहरवासीयांच्या गैरसोयीला सत्ताधारी पक्ष जबाबदार असल्याने सत्ताधार्यांनी राजीनामा देण्याची मागणी केली. भविष्यात उद्भवणार्या समस्येची जाणीव असतानाही नगरपंचायत प्रशासन आणि सत्ताधारी पक्ष यात कमी पडल्याची टीका अशोक विजयकर यांनी केली.
या मोर्चात नरेंद्र भनेरकर, उत्तम बरगे, अजय लेकुरवाडे, सुधाकर निचत, विलास चोहटकर, सुरेश काळबांडे, विलास नागपुरे, सचिन गुप्ता, सचिन पाचघरे, अतुल गुल्हाने, अनिल इखार, नीरज भार्गव, अमर टेकाम, सागर सिनकर, आवाज खान, अक्षय राजूरकर, चंदू मदनकर, जाकीर अली, सुधाकर सावरकर, सुभाष निंबेकर, निलेश सरोदे, मोहन वरघणे, अविनाश कदम यांच्यासहअसंख्य नागरिक सहभागी झाले होते.