"भटक्या कुत्र्यांचे संकट: बुलढाण्यात नागरिक त्रस्त"

    दिनांक :20-Nov-2025
Total Views |
बुलढाणा,
buldhana stray dogs सर्वत्र भटक्या मोकाट कुत्र्यांनी धूमाकूळ घातला आहे. कुत्रा चावण्याच्या वाढत्या घटनांकडे गांभीर्याने लक्ष देत सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील शैक्षणिक संस्था, रुग्णालये, क्रीडांगणे, बस स्थानके, डेपो, रेल्वे स्थानके, महामार्ग आदी ठिकाणांना श्वानमुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. कुंपण घालून भटक्या कुत्र्यांना रोखण्यास सांगितले आहे. त्यानुसार बुलढाणा नगर परिषदेकडून अद्याप कोणतीही पावले उचलण्यात आलेली नाहीत.
 
 

buldhana stray dogs 
शहरात buldhana stray dogs  भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. मुख्य रस्ता असो वा अंतर्गत रस्ते, या मोकाट कुत्र्यांच्या टोळ्या दिसून येतात. अनेकदा तर कुत्र्यांनी लहान मुलांना तसेच पादचार्‍यांवर हल्ले केल्याच्या घटना घडल्या यासंदर्भात तक्रारीही समोर आल्या आहेत. पालिकेने केवळ कागदी कारवाई न करता वास्तवात भटक्या कुत्र्यांचा योग्य प्रकारे उपाय योजना करून बंदोबस्तांची मागणी नागरिकांडून होत आहे.