छत्तीसगडमधील रिजेक्ट कोळशाची वणीत विक्री

    दिनांक :20-Nov-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
वणी, 
sale-of-reject-coal : छत्तीसगडमधून स्वस्त दरात आणला जाणारा रिजेक्ट कोल चांगल्या कोळशात मिसळून खुलेआम विक्री करणाèया कोल माफियाविरुद्ध तक्रार प्राप्त झाल्याने जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या चौकशीच्या आदेशाने वणी येथील कोल डेपोची तपासणी पोलिस विशेष पथकाने केली आहे.
 
 
 
COAL
 
 
 
भारत सरकारच्या कोळसा मंत्रालयाने प्रदूषणकारक असल्याने रिजेक्ट कोलची विक्री केवळ ‘एंड युझर’ पुरती मर्यादित केली आहे. वणी-चंद्रपूर परिसरातील काही कोळसा व्यापारी नियमांची सरळ पायमल्ली करत आहे. हा रिजेक्ट कोळसा चांगल्या कोळशात मिळवून विकण्याचा व्यवसाय सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. अवैधरित्या वाहतूक व विक्री करण्यात येणाèया रिजेक्ट कोलच्या रॅकेटचा धागा पोलिसांच्या हातात लागल्याची माहिती समोर आली आहे.
 
 
सध्या प्रकरणाचा तपास सुरू असून, या काळ्या धंद्यामागील मुख्य सूत्रधारांची नावे लवकरच बाहेर पडणार येण्याची शक्यता आहे. या कारवाईनंतर वणीतील कोळसा तस्करी व मिश्रण व्यवसायावर मोठ्या प्रमाणात आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या या धडाकेबाज हालचालीमुळे कोळसा माफियांच्या कपाळावर आठ्या आणि बाजारपेठेत खळबळ माजली आहे.