आज नितीश कुमार १०व्यांदा होणार मुख्यमंत्री, या राज्यांचे सीएम राहणार उपस्तिथ

    दिनांक :20-Nov-2025
Total Views |
पाटणा,  
chief-minister-nitish-kumar आज बिहारच्या राजकारणात एक ऐतिहासिक क्षण जोडला जाणार आहे. नितीश कुमार हे सकाळी ११:३० वाजता राजभवन येथे १० व्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. त्यांच्यासोबत सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारतील.  यांच्यासह आज भाजपाचे १४ आणि जेदयूचे ८ मंत्री शपथ घेणार आहे.  हा शपथविधी सोहळा केवळ सत्तेच्या गतिमानतेलाच आकार देणार नाही तर येणाऱ्या काळात बिहारच्या राजकारणाची दिशाही निश्चित करेल.
 
chief-minister-nitish-kumar
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा हे शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. chief-minister-nitish-kumar बिहारमध्ये, २४३ सदस्यांच्या विधानसभेत २०२ जागा जिंकून एनडीए सत्तेत परतले, ज्यामध्ये भाजपाच्या ८९, जेदयूच्या ८५, लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) च्या १९, हिंदुस्थानी अवाम मोर्चा (धर्मनिरपेक्ष) च्या पाच आणि राष्ट्रीय लोक मोर्चा (आरएलएम) च्या चार जागा आहेत.