कापूस नोंदणीसाठी 31 डिसेंबर अंतिम मुदत

नोंदणी पडताळा पूर्ण करा, त्रुटी त्वरित दुरुस्त करा मारेगाव बाजार समितीचे आवाहन

    दिनांक :20-Nov-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
मारेगाव, 
deadline-for-cotton-registration : मारेगाव परिसरातील सर्व कापूस उत्पादक शेतकèयांना कापुस किसान अ‍ॅपवर कापूस नोंदणी करण्यासाठी 31 डिसेंबर ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे अद्याप नोंदणी न केलेल्या शेतकèयांनी तत्काळ नोंदणी पडताळा पूर्ण करुन त्रुटी दुरुस्त करण्याचे आवाहन मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व संचालकांनी केले आहे.
 
 

COTTON 
 
 
 
नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, शेतकèयाचा फोटो, आधारकार्ड, आभासी 7/12 उतारा (2025 च्या कापूस पेरा नोंदणीसह) यापूर्वी नोंदणी केलेल्या शेतकèयांनी किसान अ‍ॅपमध्ये लॉगिन करून आपला फोटो व सातबारा दस्ताऐवज योग्यरित्या अपलोड झाले आहेत का, ते तपासणे आवश्यक आहे. हे नसल्यास नोंदणी ग्राह्य होऊ शकत नाही. त्यामुळे शेतकरी कापूस विक्री प्रक्रियेपासून वंचित राहू शकतो.
 
 
नोंदणीतील त्रुटीबाबतची माहिती एसएमएस व अ‍ॅपवरील नोटिफिकेशनद्वारे देण्यात येते. शेतकèयांनी त्रुटी त्वरित दुरुस्त करणे गरजेचे आहे. नोंदणीसंबंधी अडचण असल्यास शेतकèयांनी कृषी उत्पन्न बाजार समिती, मारेगाव कार्यालयाशी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळेत संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.
 
 
सीसीआयकडून अप्रूव्हल मिळाल्यानंतर व स्लॉट बुक झाल्यानंतरच कापूस बाजारात आणावा. त्याआधी कोणत्याही परिस्थितीत कापूसगाडी बाजार समितीत न आणण्याचे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तथा संचालकांनी केले आहे.