देवळी,
Rajesh Bakane देवळी-पुलगाव मतदारसंघातील शेतकर्यांवर यंदाच्या खरीप हंगामात अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या परिस्थितीत शेतकर्यांच्या प्रश्नांवर संवेदनशीलतेने लक्ष देत आ. राजेश बकाने यांनी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने ५१ कोटी रुपयांची अतिवृष्टी मदत शासनाने मंजूर केली. त्यामुळे शेतकर्यांच्या दु:खावर या निमित्ताने फुंकर मारल्या गेली असेच म्हणावे लागेल. भिडी, अंदोरी आणि आंजी (मोठी) ही तीन मंडळे वगळली गेली होती. या अन्यायकारक गोष्टीकडे लक्ष वेधत आ. राजेश बकाने यांनी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री डॉ. पंकज भोयर आणि जिल्हा प्रशासनाशी सातत्याने संवाद साधत पाठपुरावा केला आणि अखेरीस त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले. शासनाने या तीन मंडळांसाठी अतिरिक्त १५ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.
ही केवळ आर्थिक Rajesh Bakane मदत नसून, शेतकर्यांच्या दु:खावर सरकारची मायेची फुंकर आहे. आ. राजेश बकाने यांचे नेतृत्व निर्णायक ठरले आहे. यासोबतच रबी हंगामासाठी मतदारसंघातील शेतकर्यांना ८५ कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामुळे मतदारसंघातील शेतकर्यांना १५१ कोटी ४० हजार रुपयांची मदत मिळणार आहे.
महायुतीचे सरकार हे शेतकरी हिताचे आहे. शेतकर्यांच्या पाठीशी आम्ही फत शब्दांनी नाही तर कृतीने उभे आहोत. शेतकरी सुरक्षित, सक्षम आणि स्वावलंबी व्हावा, यासाठी माझा आणि सरकारचा प्रयत्न सतत सुरू राहील,असे आ. राजेश बकाने यांनी सांगितले.