नागपूर,
Ganeshpeth Bus Stand शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या गणेशपेठ बसस्थानकाच्या विस्तारीत इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले असून नव्या वर्षात हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या विभागीय अधिकार्यांनी दिली आहे. मुख्य बसस्थानकाच्या बहुप्रतिक्षित इमारतीच्या बांधकामासाठी १३ कोटी रुपये खर्च केल्या जात आहे. सध्याच्या घडीला ८० टक्के काम पूर्ण झाले उर्वरित कामासाठी किमान एक महिना लागणार असल्याने नव्या वर्षात येथून बसगाडया सोडता येणार आहे.
डिसेंबरनंतरच बस वाहतूक
मुख्य इमारतीच्या बाजूला नवीन स्टँडमध्ये १० प्लॅटफॉर्मचे बांधकाम केल्या जात आहे. येथे एकाच वेळी १० बसेस उभ्या राहू शकणार आहे. यामुळे अधिकाधिक बसेस येथून चालविणे शक्य होणार आहे. बसस्थानकाच्या विस्तार योजने अनेक करण्यात आली आहे. एमएसआरटीसीच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार इमारतीच्या बांधकामासाठी मुदतवाढ घेण्यात आली असून हा प्रकल्प डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. तर नव्या वर्षात येथून बस वाहतूक करता येणार आहे.
उर्वरित कामांना वेग
बसस्थानकाच्या Ganeshpeth Bus Stand नव्या इमारतीच्या बांधकामासाठी तांत्रिक अडचणींमुळे वेळापत्रक विस्कळीत झाले होते. बांधकाम पूर्ण करण्यात विलंब झाला असून उर्वरित काम आता पूर्ण केल्या जात आहे. शहरातील मध्यवर्ती गणेशपेठ बसस्थानकावर प्रवासी संख्या वाढली आहे. त्यामुळे जुनी इमारती लगत नव्या इमारतीची गरज लक्षात घेवून बसस्थानकाजवळ नवीन प्लॅटफॉर्म बांधल्या जात आहे. बसस्थानकाचे १० प्लॅटफॉर्मचे सरफेसिंग, अंतर्गत पायाभूत सुविधामुळे बसस्थानकावर पुन्हा दहा बसेस थांबू शकतील. स्थानकाच्या परिसरता आतापर्यंत सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम करण्यात आले आहे. कामे प्राधान्यक्रमाने पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्या जात आहे.
चालक-वाहक विश्रांतीकक्ष बांधण्याची गरज
गणेशपेठ बसस्थानकाच्या प्रमुख सुविधांमध्ये प्रवाशांसाठी प्रसाधानगृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा, बसच्या प्रतिक्षेत बसण्यासाठी आसन व्यवस्था तसेच चालक व वाहक आणि इतर कर्मचार्यांसाठी सुविधा देण्याची नितांत गरज आहे. प्रवाशांच्या सोयी सुविधासोबतच आणि महसूल वाढविण्यासाठी व्यावसायिक दुकानांसाठी जागा निश्चित जात आहे. यात प्रामुख्याने चालक-वाहक विश्रांतीकक्ष नव्याने बांधण्याची गरज निर्माण झाली आहे. गणेशपेठ बसस्थानकाच्या परिसरातील अतिक्रमणामुळे बसचालकांना बस बाहेर काढणे म्हणजे सर्कस करण्यासारखे झाले आहे. बसस्थानकाच्या परिसरात स्वच्छता राखण्यासाठी अधिक लक्ष घालण्याची गरज आहे.