अनैतिक संबंधातून प्रियकराने केला पतीचा खून

- प्रियकराची जन्मठेप उच्च न्यायालयातून कायम

    दिनांक :20-Nov-2025
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
lover-kills-husband अनैतिक संबंधांमध्ये अडसर ठरणाऱ्या पतीचा खून करणाèया 27 वर्षीय प्रियकराची जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे 2018 मध्ये ही खळबळजनक घटना घडली हाेती. अरविंद बबन गवई (25, रा. खैराव, ता. चिखली) असे शिक्षा झालेल्या आराेपीचे नाव आहे. तर खुशाल असे मृत पतीचे नाव आहे. न्यायमूर्ती अनिल पानसरे आणि न्यायमूर्ती वाय.जी. खाेब्रागडे यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
 
 
 
lover-kills-husband
 
आराेपी अरविंद आणि खुशालच्या पत्नीचे अनैतिक संबंध हाेते. अनेक दिवस दाेघांचे संबंध कायम हाेते. मात्र, दाेघांच्या प्रेमाची कुणकुण पती खुशालला लागली. यावरून खुशाल आणि त्याच्या पत्नीमध्ये वारंवार भांडणे हाेत असत. खुशालने पत्नीला मारहाण केली. त्यामुळे तिने प्रियकर अरविंदला सांगितले. खुशालने त्याचा काटा काढण्याचा कट रचला. 8 डिसेंबर 2018 राेजी खुशालला दारू पाजण्याच्या बहाण्याने अरविंदने दुचाकीवरून नेले. lover-kills-husband त्यानंतर खैराव अंबाशी शिव रस्त्यावर नेऊन त्याला काठी, चामडी पट्टा आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यात खुशालचा मृत्यू झाला. पाेलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला. या खटल्यात खुशालच्या पत्नीची साक्ष अतिशय महत्त्वाची ठरली. घटनेच्या वेळी प्रियकर अरविंदने तिला फोन केला हाेता. यावेळी तिला फोनवर मारहाणीचा आवाज आणि पतीच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला.‘तुझ्या पतीने माझी बदनामी केली आहे, त्यामुळे मी त्याला धडा शिकवणार आहे.’ अशी धमकी दिल्याचा जबाब दिली हाेता.
आराेपीने विकत घेतली हाेती दारु
सरकारी पक्षार्ते सादर करण्यात आलेले पुरावे, साक्षीदार आणि परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आराेपीचे अपील नाकारले. हाॅटेल मालकाने दाेघांना शेवटचे एकत्र पाहिले हाेते आणि आराेपीनेच दारू विकत घेतली हाेती, हा पुरावा देखील महत्त्वाचा ठरला. आराेपीने केलेला गुन्हा सिद्ध झाल्याने सत्र न्यायालयाने दिलेली जन्मठेपेची आणि 50 हजार रुपये दंडाची शिक्षा उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. सरकारर्ते अ‍ॅड. काैस्तुभ लुले यांनी बाजू मांडली.