मालेगाव,
manoj jarange patil मालेगावमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून दगडाने तिचे डोकं ठेचून हत्या केल्याच्या धक्कादायक घटनेनंतर राज्यभरात खळबळ उडाली असून, या प्रकरणात आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. या भेटीत पीडितेच्या वडिलांनी आपल्या व्यथित भावना व्यक्त केल्या आणि आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची कुटुंबाकडून मागणी केली. भेटीनंतर माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मोठ्या आक्रोशात सरकारकडे कडक मागणी ठेवली.
जरांगे पाटील म्हणाले, manoj jarange patil "मुख्यमंत्री महोदय, दोन महिन्याच्या आत कायदा करा आणि आरोपीला फाशी द्या, नाहीतर त्याचा एन्काऊंटर करा. लाडकी लेक म्हणतात, लाडकी बहीण म्हणतात, त्यांना न्याय द्या. न्याय देता येत नसेल तर तुमचे तोंड काळे करा. दोन महिन्यांच्या आत न्याय न दिल्यास संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर उतरून आपला आवाज उठवू."ते पुढे म्हणाले की, "कायद्यात बदल करा, काहीही करा, पण पीडितेच्या कुटुंबाला न्याय द्या. येत्या मंगळवारी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत बाल लैंगिक अपराध सुधारणा कायद्यात दुरुस्ती करून पीडितेच्या नावाने विशेष कायदा करा. या प्रकरणात उज्वल निकम यांची वकील म्हणून नियुक्ती करावी."मनोज जरांगे पाटील यांनी या प्रकरणात महिन्याभरात चार्जशीट दाखल करण्याची आणि आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. त्यांनी चेतावणी दिली, "न्याय न दिल्यास तुम्ही निर्दयी मुख्यमंत्री आहात असे समजले जाईल. मालेगाव, नाशिकसह संपूर्ण राज्य बंद करण्यास तयार आहोत आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देईन."पीडित कुटुंबाने सरकारला दहा दिवसांची मुदत दिली असून, जर या कालावधीत न्याय मिळाला नाही, तर मनोज जरांगे पाटील स्वतः रस्त्यावर उतरून कुटुंबासोबत आंदोलन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.या घटनेने राज्यातील नागरिकांमध्ये संताप निर्माण केला असून, सामाजिक माध्यमांवरही या प्रकरणाचे मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहेत.