सुक्रे,
Moema Claudia Massa बोलिवियातील एका छोट्या तलावात 20 वर्षांनंतर मोएमा क्लाउडिया नावाचा लुप्त समजलेला मासा जिवंत आढळला आहे. पृथ्वीवरील अन्नसाखळी आणि प्राणी-जंतुंच्या अस्तित्वातील बदलांमुळे अनेक प्रजाती नष्ट होत असतात. या नियमाच्या पार्श्वभूमीवर या माशाची प्रजातीही लुप्त झाल्याचे संशोधकांचे मत होते, मात्र अचानक तो मासा जिवंत आढळल्याने संशोधनाला नवा कलाटणी मिळाली.
मोएमा क्लाउडिया ही प्रजाती तब्बल 20 वर्षांपूर्वी शेवटी दिसली होती आणि त्यानंतर तिचा शोध लागत नव्हता. त्या अधिवासातील तलाव शेतजमिनीत रुपांतरित झाल्याने माशांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला होता. मात्र आता हा मासा आढळल्याने त्याचे अस्तित्व टिकवण्याची संधी मिळाली आहे, असे संशोधक थॉमस लिट्झ यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, माशाला त्याच्या मूळ अधिवासात सुरक्षित ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
मोएमा क्लाउडिया सारखे मासे फक्त अस्थायी अधिवासात वावरतात. त्यांचे अस्तित्व काही महिन्यांपुरतेच असते आणि आकार लहान असल्याने ते अत्यंत नाजूक असतात. मानवी हस्तक्षेपामुळे त्यांचा धोका वाढतो, त्यामुळे त्यांचा बचाव करणेही आव्हानात्मक ठरते.बोलिवि यामध्ये सापडलेल्या 32 मोसमी किलिफिश प्रजातींपैकी अर्ध्याहून अधिक फक्त या देशात आढळतात. या 20 पैकी 8 प्रजाती धोक्यात असून, मोएमा क्लाउडिया यातील एक आहे. 20 वर्षांपासून या माशाचा कोणताही नमुना सापडलेला नव्हता, त्यामुळे तो "extinct in the wild" समजला जात होता. आता या माशाच्या पुन्हा सापडण्यामुळे हवामान बदल आणि जलचरांवर होणाऱ्या परिणामांबाबत अधिक सखोल माहिती मिळवता येणार आहे.