मनपाची प्रारूप मतदार यादी आज होणार प्रसिद्ध

राजकीय गोटात उत्सुकता

    दिनांक :20-Nov-2025
Total Views |
अकोला, 
municipal-corporations-voter-list राज्य निवडणूक आयोगाने महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीच्या मतदार यादीच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा बदल केला होता. यापूर्वी १४ नोव्हेंबरला प्रसिद्ध होणारी प्रारूप मतदार यादी दि.२० नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचा आदेश आयोगाने नुकाताच काढला होता. त्यानुसार गुरुवारी प्रारूप मतदार यादी मनपा कार्यालयाच्या मुख्य सभागृहात प्रसिद्ध केली जाणार आहे.
  
municipal-corporations-voter-list
 
निवडणूक आयोगाने नव्या तारखा जाहीर करणारे परिपत्रक महानगरपालिका आयुक्तांना पाठविले होते. आयोगाने जाहीर केलेल्या नव्या वेळापत्रकानुसार, प्रारूप मतदार यादीवरील हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम तारीख २७ नोव्हेंबर २०२५ निश्चित करण्यात आली आहे. या कालावधीत नागरिकांना त्यांच्या नाव, पत्ता किंवा इतर तपशीलांमध्ये दुरुस्ती करण्याची संधी मिळणार आहे. यानंतर, प्राप्त हरकतींवर निर्णय घेऊन दुरुस्त यादी तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. municipal-corporations-voter-list दुरुस्त झालेली अंतिम प्रभागनिहाय मतदार यादी ५ डिसेंबर २०२५ रोजी प्रकाशित केली जाईल. मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी प्रसिद्ध ८ डिसेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर मतदान केंद्रनिहाय मतदार यादी १२ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने याबाबत स्पष्ट केले आहे की, मागील वेळापत्रकातील काही तांत्रिक कारणांमुळे आणि पडताळणीसाठी लागणारा अतिरिक्त कालावधी लक्षात घेऊन हा कार्यक्रम सुधारित करण्यात आला आहे. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीत पुन्हा काही दिवसांचा विलंब होणार आहे.
मतदार यादीचा कार्यक्रम
प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध: २० नोव्हेंबर २०२५
हरकती व सूचना दाखल करण्याचा अंतिम दिनांक : २७ नोव्हेंबर
प्रभागनिहाय मतदार यादी : ५ डिसेंबर
मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी : ८ डिसेंबर
मतदान केंद्रनिहाय मतदार यादी : १२ डिसेंबर