नगरसेवक पदाच्या ३ उमेदवारांची माघार

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक

    दिनांक :20-Nov-2025
Total Views |
वर्धा,
municipal election Wardha जिल्ह्यातील ६ नगरपरिषदसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र वैध ठरलेल्या ३ उमेदवारांनी आज गुरुवार २० रोजी आपले नामांकन मागे घेतले.नामांकन मागे घेतलेल्या उमेदवारांमध्ये तीनही नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत. माघार घेतलेल्यांमध्ये वर्धा, हिंगणघाट व देवळी नगरपरिषदेमधील नगरसेवकांच्या प्रत्येकी १ याप्रमाणे ३ उमेदवारांचा समावेश आहे, असे नगरपालिका प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
 

municipal election Wardha