बेसा-पिपळा मतदान केंद्रांची पाहणी

    दिनांक :20-Nov-2025
Total Views |
नागपूर,
Nagar Panchayat Besa-Pipla नगरपंचायत बेसा-पिपळा निवडणूक २०२५ पूर्वी निवडणूक निरीक्षक नितीन बवबरे यांनी मतदान केंद्रांची सविस्तर पाहणी केली. बूथची रचना, सुरक्षा, प्रवेशयोग्यता, सीसीटीव्ही, मूलभूत सुविधा व निगराणी प्रणालीची तपासणी करून आवश्यक सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. मतदान प्रक्रिया शांततापूर्ण व पारदर्शक पार पडावी यासाठी प्रशासनाला विशेष उपाययोजनांचे निर्देश देण्यात आले.
 
 
besa
 
 
निरीक्षणा दरम्यान सीसीटीव्ही व्यवस्था, मतदार कक्षांची मांडणी, साहित्य साठवण, स्वच्छता, सुशोभिकरण तसेच १४x७ निगराणी प्रणालीची तयारी याचीही पाहणी करण्यात आली.Nagar Panchayat Besa-Pipla  सुरक्षा पथकांच्या नियुक्ती व कायदा-सुव्यवस्था व्यवस्थेबाबत निरीक्षकांनी समाधान व्यक्त केले.
सौजन्य :अशोक माटे ,संपर्क मित्र