मुंबई,
Orila summoned in drug case मुंबई पोलिसांनी २५२ कोटी रुपयांच्या मेप्हेड्रोन (MD) ड्रग्ज प्रकरणात इन्फ्लुएन्सर ओरी उर्फ ओरहान याला चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. ओरीला गुरुवारी सकाळी १० वाजता पोलिस चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. अंमली पदार्थविरोधी पथकाने संयुक्त अरब अमिरातीहून (यूएई) प्रत्यार्पित केलेल्या मोहम्मद सलीम मोहम्मद सुहेल शेखच्या तपासात असे निष्पन्न झाले आहे की, सलीमने बॉलीवूडचे अनेक दिग्गज कलाकार आणि राजकीय नेत्यांसाठी देश-विदेशात ड्रग्ज पार्टी आयोजित केल्या.
या तपासात श्रद्धा कपूर, तिचा भाऊ सिद्धार्थ कपूर, निर्माता-दिग्दर्शक अब्बास-मस्तान, माजी आमदार झिशान सिद्दीकी, अभिनेत्री नोरा फतेही, इन्फ्लुएन्सर ओरी, दाऊदची बहीण हसीना पारकरचा मुलगा अलीशाह पारकर, रॅपर लोका यांच्यासह अनेकांची नावे समोर आली आहेत. पोलिसांचा दावा आहे की, या पार्टीत सहभागी व्यक्तींना अंमली पदार्थ पुरवले गेले. आता चौकशीत ओरीकडून त्याच्या दुबईच्या प्रवास, पार्टीज आणि संपर्क याबाबत विचारणा केली जाणार आहे. सलीमच्या जबाबामुळे प्रकरण आता फॉलो-अप इन्व्हेस्टिगेशनमध्ये असून, आणखी किती बॉलीवूड आणि राजकीय व्यक्तींची नावे समोर येतील हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. तपासात असेही समोर आले आहे की, प्रत्येक बॉलीवूड पार्टीत उपस्थित असलेला ओरी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये ५ जणांसोबत राहतो, असे तो स्वतः सांगतो.