मतदान केंद्रांवर दिव्यांगांची गैरसोय होता कामा नये : बनकर

*सिंदीत ६ मतदान केंद्रांची पाहणी

    दिनांक :20-Nov-2025
Total Views |
वर्धा, 
Vijaya Bunkar : जिल्ह्यातील सहा नगरपालिकांतील नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक बजावण्यासाठी मतदान केंद्रांवर येणार्‍या दिव्यांग मतदारांची गैरसोय होणार नाही याची विशेष दक्षता अधिकार्‍यांनी घ्यावी, अशा सूचना निवडणूक निरीक्षक विजया बनकर यांनी दिल्या.
 
 
 
vijaya
 
 
 
जिल्ह्यातील ६ नगरपालिकांची सार्वत्रिक निवडणूक होत असून या सहा नगरपालिकांसाठी निवडणूक निरीक्षक म्हणून नागपूर येथील सहाय्यक विभागीय आयुत (पुनर्वसन) विजया बनकर यांची नियुती करण्यात आली आहे. विजया बनकर यांनी बुधवारी सिंदी रेल्वे गाठून नेहरू विद्यालयातील सहा तर सुभाष प्राथमिक शाळेतील दोन मतदान केंद्रांची पाहणी केली. सोबतच त्यांनी सेलडोह मार्गावरील स्थिर निगरानी पथकातील अधिकार्‍यांशी संवाद साधून तेथील कामकाजाची माहिती जाणून घेतली. २ डिसेंबरला वर्धा, हिंगणघाट, आर्वी, देवळी, पुलगाव व सिंदी रेल्वे नगरपालिकेसाठी मतदान होणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी अधिकार्‍यांना दिल्या. यावेळी सिंदी रेल्वे येथील निवडणूक निर्णय अधिकारी बबीता आळंदे, संपर्क अधिकारी तथा महिला व बालकल्याण अधिकारी मनिषा कुरसंगे यांची उपस्थिती होती.