कीव,
Russia launches airstrikes on Ukraine रशियाने युक्रेनवर मागील २४ तासांत तब्बल ५२४ हवाई हल्ले करून युद्धाच्या प्रचंड तीव्रतेची आठवण करून दिली आहे. युक्रेनच्या कीव, टेरनोपील आणि खारकीव या तीन शहरांवर रशियाच्या हल्ल्यांनी दारुगोळ्यांचा वर्षाव केला, ज्यामुळे संपूर्ण देश हादरून गेले. हा मागील काही महिन्यांत रशियाने युक्रेनवर केलेला सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे. पुतिन यांनी हा हल्ला केवळ युक्रेनला नाही तर नाटोला चेतावणी देण्यासाठीही केला आहे. त्यांनी नाटोला स्पष्ट केले आहे की, जर युक्रेन-रशिया युद्धात थेट हस्तक्षेप झाला, तर परिणाम अधिक गंभीर होतील.

युक्रेनी सैन्यानुसार, १८ नोव्हेंबरच्या संध्याकाळी सहा वाजल्यापासून रशियाने मोठ्या प्रमाणात ड्रोन आणि मिसाइल हल्ले सुरू केले आणि १९ नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत हे हल्ले सुरु राहिले. हल्ल्यात ४६ क्रूझ मिसाइल्स आणि ४७६ ड्रोन वापरण्यात आले. काही वेळेस एका ड्रोनने रोमानियाच्या एअरस्पेसमध्ये घुसखोरी केली, ज्यावर रोमानियाने तातडीने दोन युरोफायटर टायफून आणि दोन F-16 फायटर जेट्स हवेत झेपावले. पोलंडमधील रिजेशो आणि ल्यूबलीन एअरपोर्टसुद्धा काही वेळासाठी बंद करावे लागले.
या हल्ल्यात आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला असून अनेक नागरिक जखमी झाले आहेत. रशियाने गृह, शिक्षण सुविधा आणि पायाभूत सुविधा निशाण्यावर ठेवून अधिकाधिक नागरिकांना मारण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे, असे युक्रेनचे गृहमंत्री इहोर क्लिमेंको यांनी सांगितले. ट्रम्प यांच्या आर्थिक निर्बंधांच्या प्रयत्नांना महत्त्व देत पुतिन यांनी हल्ला सुरू ठेवून युद्धाची तीव्रता वाढवली असून, या संघर्षामुळे युक्रेनमध्ये परिस्थिती अत्यंत गंभीर आहे.