500 वर्षांच्या लढ्यानंतर श्रीराम मंदिराचे स्वप्न साकार

पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचे प्रतिपादन

    दिनांक :20-Nov-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
पुसद, 
Pushpendra Kulshrestha : 500 वर्षांचा लढा दिल्यानंतर 2024 साली अयोध्येतील श्रीराम मंदिराचे स्वप्न साकार झाले. यावरून मागील 150 वर्षात विस्कळीत झालेली देशाची घडी 2014 नंतर हळूहळू सुरळीत होत असल्याचे लक्षात येईल. ही घडी पूर्णपणे सुरळीत करण्यासाठी मतदान करण्यापूर्वी 30 सेकंद विचार करा, असे आवाहन राष्ट्रवादी वक्ता, प्रखर विचारक तथा पत्रकार पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी केले.
 
 
 
y20Nov-Puspendra
 
 
 
शिवप्रताप दिनाचे औचित्य साधून विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, श्री शिवप्रतिष्ठान हिन्दुस्थान यांचे वतीने बुधवार, 19 नोव्हेंबर रोजी बियाणी ले-आऊट, पुसद येथे आयोजित जाहीर व्याख्यानात प्रमुख वक्ता म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर जितेंद्र महाराज, यशवंत महाराज, नारायण शिंदे, महेंद्रनाथ मस्के, गोविंद गुरु, गजानन महाराज माऊली कासोळा, भारत पेन्शनवार, रवी ग्यानचंदानी उपस्थित होते.
 
 
वैष्णव ढोकणे यांनी देशात घुसलेला पहिला आतंकवादी अफजलखान होता, त्याचा खात्मा आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी केला म्हणून आज शिवप्रताप दिन साजरा करतो, असे सांगितले. नारायण मस्के यांनी धर्मजागृतीसाठी सज्ज व्हा, असे आवाहन केले. पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी व्यक्तीच्या कर्मानुसार जाती बनली, आईच्या पोटातून जन्मलेला जाती घेऊन येत नसल्याचे सांगून जाती व्यवस्थेवर कठोर प्रहार केला. तब्बल 2 तास चाललेल्या व्याख्यानात कुलश्रेष्ठ यांनी मुस्लीम समाजातील निकाह, मिशनरी शाळेतून मिळणाèया शिक्षणावर टीका केली.
 
 
माजी पंतप्रधान नरसिंहराव यांचा भारतीय राजनीतीचे चाणक्य तर बाळासाहेब ठाकरे यांचा ‘शेर आदमी’ असा आदराने उल्लेख करून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. संविधानमध्ये सेक्युलर’ शब्द टाकू नये म्हणून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर का आग्रही होते, याचे विस्तृत कारण त्यांनी सांगितले.
 
 
स्त्री जातीचा सन्मान करा, मंदिराचा पैसा सरकार तिजोरीत जमा करण्याच्या कायद्याच्या विरोधासाठी एक व्हा, पंचतत्वाचे रक्षण करा असे आवाहन त्यांनी शेवटी केले. कडाक्याच्या थंडीतही व्याख्यानाला हजारो श्रोते उपस्थित होते. कार्यक्रमासाठी वासंती सरनाईक, प्रमोद रायपुरकार, बालाजी कामीनवार, सुनीता तगलपल्लेवार, गायत्री कोडापे यांनी परिश्रम घेतले.
पहिली वोट चोरी 1946 साली..
 
 
राहुल गांधी आज वोट चोरीचा आरोप करीत असले तरी 1946-47 साली जवाहरलाल नेहरू यांना अध्यक्षपदी बसविताना ‘वोट चोरी’ नव्हे तर ‘डाका’ पडला होता. त्यावेळी सरदार वल्लभभाई पटेल अध्यक्ष निवडल्या गेले असतानाही पंडित जवाहरलाल नेहरू यांना विजयी घोषित करण्यात आल्याचा खळबळजनक खुलासा पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी केला.