मुंबई,
Strong bullish in Indian stock market आजच्या शेअर बाजारात जोरदार तेजी दिसून आली असून सेन्सेक्स आणि निफ्टी उच्चांक पातळीवर पोहोचले आहेत. सेन्सेक्स अखेरच्या सत्रात ४३६.२१ अंकांनी वाढत ८५,६३२.५८ वर स्थिरावला, तर निफ्टी १३९.४० अंकांनी उसळून २६,१९२.१५ वर बंद झाला. मध्य सत्रात सेन्सेक्सने ८५,५९० आणि निफ्टीने २६,२०० पातळी पार केली होती, ज्यामुळे दोन्ही बेंचमार्क निर्देशांकांमध्ये उच्चांक नोंदवला गेला.

आज बाजारातील रॅलीमध्ये प्रामुख्याने फायनांशियल सर्विसेस, फायनांशियल सर्विसेस एक्स बँक, तेल व गॅस क्षेत्रातील निर्देशांकांनी महत्त्वाची भूमिका बजावली. जागतिक बाजारातील अस्थिरतेनंतरही भारतीय बाजारातील फंडामेंटल्स मजबूत असल्यामुळे तेजी दिसली, मात्र आयटी क्षेत्रातील शेअर्सची वाढ अपेक्षेपेक्षा कमी राहिली. बँक निर्देशांकाने किरकोळ वाढ नोंदवली, तर मिडकॅपमध्ये सकारात्मक हालचाल दिसली, आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये घसरणीमुळे बाजारात रॅली थोडी मर्यादित राहिली. आजच्या सत्रात भारतीय शेअर बाजारातील तेजी आणि क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये वाढ हे मजबूत आर्थिक फंडामेंटल्स आणि जागतिक बाजारातील सकारात्मक घडामोडींच्या संगमाचे प्रतीक ठरले आहे.