अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

पाच नराधम गजाआड; दोन फरार

    दिनांक :20-Nov-2025
Total Views |
तळेगाव (श्या.पंत),
Talegaon Police तळेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला. अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार पुढे आला. या प्रकरण पोलिसांनी चार नराधम व एक अल्पवयीनाला गजाआड केले असून दोन जण अद्याप फरार आहे. दरम्यान, वैद्यकीय तपासणीत पीडित अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याचे स्पष्ट झाले असून हा अहवाल तपासातील महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे.
 

Talegaon Police Gang rape of a minor girl 
काही दिवसांपूर्वी Talegaon Police  पीडित मुलीची अचानक प्रकृती बिघडल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉटरांनी तिच्या प्रकृतीतील संशयास्पद लक्षणे पाहून पुढील तपासणी केली असता तिच्यावर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले. वैद्यकीय अहवालात मुलगी गरोदर असल्याचे पुढे आल्यावर कुटुंबीयांनी तळेगाव पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी जलदगतीने कारवाई करत पाच जणांना अटक केली आहे. दरम्यान, आरोपींपैकी एक हा अल्पवयीन असून तो पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती आहे. त्याची कायदेशीर चौकशी संबंधित प्रक्रियेनुसार केली जात आहे. उर्वरित दोन जण पळून गेले असून त्यांचा शोध घेण्यासाठी दोन विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याने तपास अत्यंत गोपनीयतेने सुरू आहे. फरार आरोपींना लवकरच अटक केली जाईल असे ‡पोलिसांनी सांगितले. आरोपींना वर्धा न्यायालयात हजर करण्यात आले असून सोमवार २४ रोजीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रशेखर ढोले, पोलिस निरीक्षक मंगेश भोयर करीत आहेत.