रायगड,
Thar in Tamhini Ghat रायगडच्या ताम्हिणी घाटात भीषण अपघात घडला आहे. पुणे–माणगाव मार्गावर एका थार जीपने अंदाजे ५०० फूट खोल दरीत कोसळल्याने तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीच्या अनुसार, अवघड आणि तीव्र वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडल्याचे दिसत आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून बचाव पथकाकडून बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे. ड्रोन शुटमध्ये गाडी आणि मृतदेह आढळल्यामुळे बचाव कार्यास गती मिळाली आहे. मृत झालेल्या तीन तरुणांव्यतिरिक्त गाडीत आणखी काही जण असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.