तुला मराठी बोलता येत नाही का?

- लोकलमधल्या वादानंतर युवकाची आत्महत्या

    दिनांक :20-Nov-2025
Total Views |
कल्याण/मुंबई,
commits suicide after argument : विविधतेत एकता असणारा आपला देश गेल्या काही दशकांमध्ये भाषिक विवादाला तोंड देतो आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देशभरातील नागरिक उद्योग-नोकरीसाठी येत आहेत. त्याच मुंबईत मराठी बोलण्याचा आग्रह केला जातो. अर्थात, त्यात गैर काहीच नाही. पण, जेव्हा आग्रह, अट्टाहासात बदलतो तेव्हा संवादाची भाषा वादाची बनते. कल्याणमधील एका दुर्दैवी घटनेनंतर, सुज्ञ नागरिकांनी यावर विचार करण्याची वेळ आली आहे.
 
 
 
suicide
 
 
 
19 वर्षीय अर्णव खैरे लोकलमध्ये चढताना हिंदीत बोलला. त्यावरून काही युवकांनी ‘तुला मराठी बोलता येत नाही का?’ असे म्हणून त्याच्याशी वाद घातला. ‘मराठी बोलण्याची लाज वाटते का?’ असे म्हणत शिवीगाळ करीत त्याला मारहाण केली. डोंबिवली ते ठाणे स्थानकादरम्यान ही घटना घडली. या मारहाणीमुळे अर्णवला मानसिक तणाव आला. घाबरलेल्या अर्णवने कल्याणमध्ये घरीच गळफास घेतला. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात अर्णवचे वडील जितेंद्र यांनी जबाब नोंदवला असून पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.
 
 
कल्याण पूर्व तिसगाव नाका येथील सहजीवन रेसिडेन्सीमध्ये राहणाèया अर्णव खैरे हा मुलुंडच्या केळकर कॉलेजमध्ये विज्ञानशाखेत शिकत होता. 18 नोव्हेंबर रोजी तो नेहमीप्रमाणे कल्याणहून लोकलने कॉलेजकडे निघाला होता. लोकलमध्ये गर्दीत अर्णवने हिंदीत ‘थोडा आगे हो भाई...’ असे म्हटले.
 
 
इतक्यात आजूबाजूच्या चार ते पाच जणांच्या टोळक्यांनी तुला मराठी बोलता येत नाही का? अशी विचारणा करत, मराठी बोलण्याची लाज वाटते का? असे म्हणत त्याला मारहाण केली. या घटनेने घाबरलेला अर्णव ठाणे स्टेशनला उतरला आणि मागील लोकलने कॉलेजला गेला. त्याने प्रॅक्टिकल पूर्ण केले. पण, मानसिक तणावामुळे कॉलेज अर्धवट सोडून दुपारी घरात परतला. याच दरम्यान अर्णवने वडिलांना फोन करून सगळा घटनाक्रम सांगितला.
 
 
सायंकाळी सातच्या सुमारास वडील घरी आले असता बेडरूममध्ये अर्णवने ओढणीने गळफास घेतल्याचे आढळले. तातडीने रुख्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्याला रात्री 9.05 वा. मृत घोषित केले. या घटनेने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, महाराष्ट— नवनिर्माण सेनेने या घटनेचा सखोल तपास करून या प्रकरणी मराठी तरुण आहेत की मराठी याचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान लोकलमधली झुंडशाही, मराठी-हिंदी वाद कोणत्या टोकाला पोहचला हेच या घटनेवरून दिसून येते. पोलिसांनी अर्णवच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी अर्णवच्या कुटुंबीयांनी केली आहे.