नगराध्यक्षसाठी ४१ तर सदस्यत्वासाठी ७१७ उमेदवार रिंगणात
दिनांक :21-Nov-2025
Total Views |
अकोला,
municipal-elections जिल्ह्यात पाच नगरपरिषद व एका नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी १४ तर सदस्यत्वासाठी दाखल केलेल्या ७१७ उमेदवारांनी अर्ज मागे घेत निवडणुकीतून माघार घेतली.आता नगराध्यक्षसाठी ४१ तर सदस्यत्वासाठी ७१७ जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत.थेट नगराध्यक्ष जनतेतून निवड होत असल्याने या निवडणुकीत चुरस वाढली आहे.
जिल्ह्यातील अकाेट, मूर्तिजापूर, बाळापूर, तेल्हारा व हिवरखेड या नगरपरिषदेसह बार्शीटाकळी नगरपंचायतीसाठी निवडणुकीची प्रक्रिया पार पडत आहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत अध्यक्षपदासाठी एकूण ७२ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले हाेते. त्यापैकी ६१ वैध तर ११ अर्ज अवैध ठरले. municipal-elections सदस्य पदासाठी एकूण ९३१ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले हाेते. त्यापैकी ८५४ अर्ज वैध तर ७७ अर्ज अवैध ठरले. दरम्यान तिकीट न भेटल्याने नाराज झालेल्यानी पक्षात बंडखोरी करीत अर्ज दाखल केले आहेत.यातील काहींना शांत करण्यात पदाधिकाऱ्यांना यश आले आहे.आता अपिल असलेल्या ठिकाणी २५ नोव्हेंबर पर्यंत माघारी घेता येईल आहे.त्यामुळे काही ठिकाणच्या लढती २५ नोव्हेंबर रोजी स्पष्ट होतील तर २६ नोव्हेंबर रोजी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होऊन चिन्ह याच दिवशी वाटप होणार आहेत.
सर्वाधिक उमेदवार आकोटमध्ये
आकोट नगरपरिषदेत १७ प्रभाग असून ३५ सदस्यांसाठी १८७ उमेदवार तर अध्यक्ष पदासाठी ८ उमेदवार रिंगणात आहेत.बाळापूर नगरपरिषदेत १२ प्रभाग असून २५ सदस्यांसाठी ९५ तर अध्यक्षासाठी ६ उमेदवार मैदानात आहेत. मूर्तिजापूर नगरपरिषदेत १२ प्रभाग असून २५ सदस्यासाठी १५७ उमेदवार तर नगराध्यक्ष पदासाठी ९ उमेदवार रिंगणात आहेत.१० प्रभाग असणाऱ्या तेल्हारा नगरपरिषदेत २० जागांसाठी ९२ उमेदवार तर अध्यक्षपदासाठी ६ उमेदवार रिंगणात आहेत.तर हिवरखेड नगरपरिषदेत १० प्रभागात २० सदस्यत्वासाठी ९९ उमेदवार तर अध्यक्ष पदासाठी ७ उमेदवार रिंगणात आहेत.तर बार्शीटाकळी नगरपंचायत मध्ये १७ प्रभाग असून १७ सदस्यत्वासाठी ८७ उमेदवार तर नगराध्यक्षपदासाठी ५ उमेदवार रिंगणात आहेत.