कारंजा लाड,
municipal council elections येत्या २ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या कारंजा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीतून एक नगराध्यक्ष व २४ नगरसेवकपदाच्या अशा एकूण २५ उमेदवारांनी २१ नोव्हेंबर रोजी माघार घेतली आहे. त्यामुळे आता निवडणूक रिंगणात नगराध्यक्षपदासाठी १२ तर सदस्यांच्यापदासाठी १५९ उमेदवार उरले आहे.
कारंजा नगरपरिषदेच्या अध्यक्ष व ३१ सदस्यांच्या रिक्त जागेसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होत असून, १० ते १७ नोव्हेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज भरून घेण्यात आले. या तारखेपर्यंत नगराध्यक्षपदासाठी १५ तर नगरसेवक पदासाठी २४६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. दरम्यान, १८ नोव्हेंबर रोजी झालेल्या छाननी प्रक्रियेतून नगराध्यक्ष पदाचे २ तर सदस्यपदाचे ६३ नामांकन अर्ज बाद झाले. त्यानंतर १९ ते २१ नोव्हेंबर यादरम्यान उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची संधी देण्यात आली होती.municipal council elections त्याअंतर्गत २१ नोव्हेंबर रोजी नगराध्यक्ष पदाच्या अपक्ष उमेदवार सालेह कौसर इरफान मिर्झा यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यासोबत सदस्य पदाचे उमेदवार मनोज गिदवानी ५ ब, हसन चौधरी १ ब , स्वप्नील माजलगावकर २४ ब, ज्ञानेश्वर सुर्वे ८ ब, प्रवीण भुजाडे ८ ब, चांदशा कासमशा ११ अ, रमजान पप्पूवाले ४ अ, शोभा गढवाले १२ अ, तौसिफ रजा खान आसिफ खान ८ ब, चंदू खराडे ८ ब, हरीश मनुजा ५ ब, रेश्मा तबसूम निसार खान १० ब, प्रशांत देशमुख ६ ब, प्रीती धाकतोड ७ क, आरती करोसे ५ अ, फुजेल फरहत शमीम फरहत १५ अ, संजना रायदास ५ अ, मोहन पंजवाणी , सालेह कौसर इरफान मिर्झा १० ब , प्रीती धाकतोड ७ ब, रश्मी कर्हे ९ अ, पुंडलिक झोंबाडे ७ अ, आरेफउल्ला खान हिदायतउल्ला खान ३ ब, राहुल मोहोळ ७ अ यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. येत्या २६ नोव्हेंबर रोजी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार आहे.