भावनिक आठवणीत हरवली ऐश्वर्या राय...

    दिनांक :21-Nov-2025
Total Views |
मुंबई,
Aishwarya Rai बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. नेहमीच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी ही अभिनेत्री मागील काही दिवसांपासून वैयक्तिक आयुष्यावरील चर्चांमुळे चर्चेत असली, तरी तिने नुकताच केलेला एक भावनिक पोस्ट विशेष लक्ष वेधून घेत आहे.
 

Aishwarya Rai 
आंध्र प्रदेशात झालेल्या श्री सत्य साई बाबा यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात ऐश्वर्या उपस्थित होती. तेथे तिने दिलेल्या भाषणातून महत्त्वाचा संदेश देत अनेकांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या काही फोटोमुळे ती भावूक झाल्याचे दिसून आले.वडिलांच्या वाढदिवसानिमित्त ऐश्वर्याने जुन्या आठवणींनी भरलेले काही फोटो शेअर करत मनोगत व्यक्त केले. “वाढदिवसाच्या शुभेच्छा, प्रिय बाबा-अज्जा… पालक देवदूत. आम्ही तुमच्यावर खूप प्रेम करतो. आराध्या आता १४ वर्षांची झाली आहे. तुमच्या सर्वांच्या प्रेमाबद्दल आणि आशीर्वादाबद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत,” असे तिने लिहिले.
 
 
तिने शेअर Aishwarya Rai  केलेल्या छायाचित्रांपैकी एका फोटोत लहानगी आराध्या आजोबांच्या कुशीत दिसत असून, ऐश्वर्या त्यांच्याजवळ उभी आहे. आजोबा नातीकडे प्रेमाने पाहत असल्याचा तो अनमोल क्षण ऐश्वर्याने प्रथमच चाहत्यांसोबत शेअर केला. २०१७ मध्ये ऐश्वर्याच्या वडिलांचे आजारपणानंतर निधन झाले होते. वडिलांच्या अत्यंत जवळ असलेल्या ऐश्वर्याने त्यांच्या आठवणींना उजाळा देत ही पोस्ट लिहिली.अलीकडेच आराध्याचा वाढदिवस साजरा झाला. या निमित्ताने अमिताभ बच्चन यांनीही नातीसाठी खास शुभेच्छा देणारी पोस्ट शेअर केली होती. आई आणि मुलगी अनेकदा एकत्र प्रवास करताना दिसतात. काही दिवसांपूर्वीही मायलेकी विदेश प्रवासासाठी विमानतळावर स्पॉट झाल्या होत्या.ऐश्वर्याच्या भावनिक पोस्टवर चाहत्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद उमटत असून, अनेकांनी तिच्या कुटुंबियांसाठी प्रेम आणि पाठिंबा व्यक्त केला आहे.