हिंगणघाटात भाजपाच्या दोन्ही उमेदवारांचे अर्ज मागे

* आ. कुणावार यांचा पुढाकार

    दिनांक :21-Nov-2025
Total Views |
हिंगणघाट, 
bjp-candidates-in-hinganghat माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी यांच्या पत्नी जया, माजी नगरसेवक छाया सातपुते यांनी आ. समीर कुणावार यांच्या पुढाकाराने आपले नगराध्यक्षपदाचे अर्ज मागे घेतल्याने भाजपच्या गोटात उत्साह निर्माण झाला आहे. भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार नयना तुळसकर यांनी या दोघींच्याही निर्णयाचे स्वागत केले. या नेत्यांच्या मार्गदर्शना खाली काम करण्यात आपल्याला आनंद होईल अशी प्रतिक्रिया व्यत केली. येथे भाजपाच्या उमेदवार डॉ. नयना तुळसकर आणि शरद पवार गटाच्या शुभांगी डोंगरे यांच्यातच थेट लढत होणार असल्याचे आजचे चित्र आहे.
 

bjp-candidates-in-hinganghat 
 
सकाळी भाजपाचे संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, माजी खा. सुरेश वाघमारे, वसंत आंबटकर यांच्या उपस्थितीत प्रेम बसंतानी यांच्या निवासस्थानी झालेल्या चर्चेनंतर जया प्रेम बसंतानी व छाया सातपुते यांनी उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला. bjp-candidates-in-hinganghat त्यानंतर प्रभाग १४ मधून भाजपच्या शारदा पटेलचा यांनी अपक्ष उमेदवार जया प्रेम बसंतानी यांच्या समर्थनार्थ उमेदवारी मागे घेतली तर प्रभाग १४ मधून जया बसंतानी यांना भाजप समर्थन करणार आहे. या नवीन घडामोडी मुळे भाजपात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.