आर्वीत नगराध्यक्षाचे ६ तर सदस्यपदासाठी ८६ उमेदवार मैदानात

    दिनांक :21-Nov-2025
Total Views |
आर्वी, 
arvi-mayoral-member : आर्वी नगरपालिकेत अध्यक्षपदाकरता ६ तर नगरसेवकाकरता ८६ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज कायम झाले. नगराध्यक्ष पदाकरता कोणीही अर्ज मागे घेतला नसून नगरसेवकाकरिता आज ८ जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.
 
 
k
 
नगराध्यक्षपद खुला प्रवर्ग महिलांकरता असून सहा महिलांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला. भाजपा, काँग्रेस, बहुजन समाज पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व एका अपक्ष उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. आर्वी नगरपालिकेमध्ये बारा प्रभाग असून २५ नगरसेवकांकरिता ८६ उमेदवारांनी आपले अर्ज कायम ठेवले. त्यामध्ये काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, शरदचंद्र पवार गट, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन समाज पार्टी तसेच अपक्षांनी आपले अर्ज कायम ठवले. बहुतेक प्रभागांमध्ये सरळ तर काही प्रभागांमध्ये त्रिकोणी तर काही प्रभागांमध्ये बहुरंगी लढती होणार आहे.