अनिल कांबळे
नागपूर,
nagpur mankapur crime news आपली मुलगी कुण्यातरी युवकाच्या प्रेमात पडली असून ती पळून जाऊन लग्न करण्याचा संशय वडिलांना आला. त्यांनी पत्नी व मुलीशी वाद घातला. वादानंतर वडिलाने मुलीवर चाकूने हल्ला करीत तिचा खून करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वडिलाने विष प्राशन करुन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना आज गुरुवारी दुपारी मानकापुरात घडली. रामाप्रसाद तिवारी (53)असे आत्महत्या केलेल्या पित्याचे नाव आहे.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामाप्रसाद तिवारी हा पत्नी व 18 वर्षांच्या मुलीसह मानकापूर परिसरातील झेंडा चाैकातील राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज अपार्टमेंटमध्ये किरायाने राहत हाेता. ताे प्राॅपर्टी डिलींगचा व्यवसाय करीत हाेता. गेल्या काही दिवसांपासून त्याला आपल्या मुलीच्या चारित्र्यावर संशय आला. त्यामुळे तिच्यावर ते पाळत ठेवत हाेते. गुरुवारी दुपारी त्याची पत्नी काही कामानिमित्त बाहेर गेली असता रामाप्रसादने पुन्हा मुलीशी भांडण सुरू केले. त्यामुळे संतापाच्या भरात रामाप्रसादने मुलीच्या मानेवर, चेहरा, गालावर चाकूने वार करत तिला लाथाबुक्यांनीही मारहाण केली. रक्ताच्या थाराेळ्या बेशुद्ध पडलेली मुलगी मरण पावल्याचे वाटल्याने त्याने घरातून पळ काढला. मानकापुरातील रेल्वे परिसरात त्याने विष प्राशन केले. बेशुद्धावस्थेत असलेल्या रामाप्रसादबाबत
नागरिकांनी मानकापूर पाेलिसांना माहिती दिली. पाेलिसांनी त्याला मेयाेत पाठवले. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मानकापूर पाेलिसांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे.
संशय आणि कुटुंब उद्धवस्त
रामाप्रसाद तिवारी याला फक्त मुलीच्या चारित्र्यावर संशय हाेता. डाेक्यात संशयाचे भूत संचारल्यामुळे त्याने मुलीला ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत वडिल जिवाने गेले तर मुलगीही मृत्यूच्या दारात उभी आहे. त्यांची पत्नी मुलीसाेबत रुग्णालयात आहे तर पतीच्या अंत्यसंस्काराची घाई आहे. हा प्रकार घडल्याने परिसरात हळहळ हाेती.