दाते बँक प्रकरण पोहोचले मुख्य सचिवाच्या ‘दरबारात’

आरोपीच करतो तक्रार दाखल : पोलिस अधीक्षकांच्या भूमिकेकडे लक्ष

    दिनांक :21-Nov-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा यवतमाळ,
Babaji Date Mahila Co-operative Bank case येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेत आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. याप्रकरणात पोलिसात गुन्हा सुद्धा दाखल झाला आहे. तरी देखील या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली नसल्याने याप्रकरणाची आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी अतिरिक्त मुख्य सचिव गृहविभाग डॉ. इकबाल सिंह चहल यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती शुक्रवार, 21 नोव्हेंबर रोजी अतुल जागताप यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
 

Babaji Date Mahila Co-operative Bank case 
यावेळी सुरेश शिंदे पाटील उपस्थित होते. पुढे बोलताना जगताप म्हणाले की, बाबाजी दाते महिला सहकारी बँकेत तब्बल 242 कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाला आहे. या प्रकरणाचा पोलिसात एमपीआयडी अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल असताना पोलिस विभागाने मोजक्याच आरोपींना ताब्यात घेतले. मात्र, या घोटाळ्यातील मुख्य आरोपी व सूत्रधार असलेल्या तत्कालीन संचालक मंडळापैकी एकाही आरोपीस जाणीवपूर्वक अटक केली नाही. तसेच या बँकेत माझ्यावर कोणतेही कर्ज नसताना बनावट कर्ज प्रकरण करून माझ्यावर कर्ज दाखविण्यात आले आहे. त्यामुळे हे कर्ज प्रकरण निल करण्यासाठी मी रितसर पाठपुरावा केला आहे. या प्रकरणातील एका महिला आरोपीला अद्यापही पोलिसांनी अटक केली नाही. ती महिला कर्मचारी बँकेत कार्यरत असून, त्या कर्मचाèयाने माझ्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी ज्या अवधूतवाडी पोलिस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे, त्याच ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करीत आहे. मात्र, संबंधित पोलिस ठाणेदार त्यांना अटक करत नाही. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करुन बाबाजी दाते महिला बँक प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
 
 

पोलिस ठाणेदाराची तक्रार करू
आरोपी स्वत: ठाण्यात जाऊन माझ्याविरोधात विनाकारण तक्रार दाखल करीत आहे. मात्र, संबंधित पोलिस ठाणेदार त्या महिला आरोपीला ताब्यात घेण्याचे सोडून मला ठाण्यात बोलावून दमदाटी करीत असल्याने या ठाणेदाराविरोधात वरिष्ठांकडे तक्रार करणार आहो.

- अतुल जगताप