राज्यस्तरीय शालेय जिम्नॅस्टिक स्पर्धेला बावनकुळेंची भेट

    दिनांक :21-Nov-2025
Total Views |
नागपूर,
gymnastics competition तालुका क्रीडा संकुलात सुरू असलेल्या राज्यस्तरीय शालेय जिम्नॅस्टिक स्पर्धेला महाराष्ट्राचे महसूल व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट देऊन खेळाडूंचे मनोबल वाढवले. त्यांनी विविध गटांतील विजेत्या खेळाडूंना पारितोषिके प्रदान करत त्यांच्या उज्ज्वल भवितव्यास शुभेच्छा दिल्या. स्पर्धास्थळी त्यांनी व्यवस्थापन, उपलब्ध सुविधा, तसेच खेळाडूंची तयारी याची माहिती घेतली. शालेय स्तरावरूनच जिम्नॅस्टिकसारख्या कौशल्यपूर्ण आणि मेहनती खेळाला मिळत असलेला उत्साह पाहून ते समाधान व्यक्त करताना खेळाडूंना सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
 
Bawankule
 
कार्यक्रमाला जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, मनपा क्रीडा अधिकारी डॉ. पीयूष अंबुलकर, क्रीडा मार्गदर्शक निशांत पाटील, जिम्नॅस्टिक संघटनेचे सचिव पुरूषोत्तम दरवानकर, क्रीडा अधिकारी अनिल बोरवार, कोराडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच नरेंद्र धनोले यांच्यासह अर्चना दिवाने, युवा मित्र अंशुल जिचकार, अनुराधा अमीन, कमल धात्रक, लुकेश वरोकर, रितेश मैंद, उमेश निमोने, अविनाश भोयर, अरविंद खोपे, संदीप दिवाने, दिवाकर तितरमारे, कुणाल भोस्कर, निलोफर शेख आणि इतर मान्यवर उपस्थित होते. खेळाडू, पालक व क्रीडाप्रेमींची मोठी उपस्थिती लक्षणीय ठरली. gymnastics competition स्पर्धेमुळे जिल्ह्यातील जिम्नॅस्टिक क्रीडा संस्कृतीला नवीन चालना मिळणार असल्याचे मतही उपस्थितांनी व्यक्त केले.
सौजन्य: अंशुल जिचकार, संपर्क मित्र