नांदेड,
Brutal murder in Nanand नांदेड जिल्ह्यातील एका शेतात धक्कादायक दुहेरी हत्याकांड उघडकीस आले आहे. एकाच घरातील दोन सख्ख्या जावांचा गळा दाबून निर्घृण हत्या करण्यात आली असून ही घटना लुटमारीशी संबंधित असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मृत महिलांची नावे अंतकलाबाई अशोक आढागळे (६०) आणि अनुसयाबाई साहेबराव आढागळे (४५) अशी आहेत.
माहितीनुसार, दोघी शेतात कापूस वेचणीसाठी गेल्या होत्या. या दरम्यान त्यांचा गळा दाबून हत्या करण्यात आली आणि दोघींचा जागीच मृत्यू झाला. दोन्ही मृतदेह शेतात पडलेले आढळल्याने गावात खळबळ उडाली. गावकऱ्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली, आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहचून तपास सुरू केला. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की दोन्ही महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र गायब आहे. पोलीस या हत्येमागच्या आरोपींचा शोध घेत आहेत. दिवसाढवळ्या घडलेल्या या दुहेरी हत्याकांडामुळे आढागळे कुटुंब आणि गावकऱ्यांमध्ये मोठा धक्का बसला आहे.